पान:ज्योतिर्विलास.pdf/161

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरु. वद्विक्षय आहेच. शिवाय त्यांस वारंवार ग्रहणे लागतात. गुरूच्या १७ रात्रीत पहिल्या उपग्रहास चार वेळां, दुसऱ्यास दोन वेळां, आणि तिसन्याला एक वेळ ग्रहण लागते. व गुरूच्या अवाढव्य छायेमुळे ही ग्रहणे कधी कधी गुरूच्या अध्याँ किंवा पाऊण रात्रीपर्यंत असतात. तेव्हां गुरूच्या चंद्रांचा उपयोग गुरूला काही आहे असे आपल्या दृष्टीने तरी दिसत नाही. तर मग हे चंद्र केले कशाला? असें सहज मनांत येते. गुरूला त्याच्या चंद्रांचा उपयोग दिसत नाही. परंतु चंद्राला त्याचा आहे असे मानण्यास जागा आहे. सूर्याचा बुध, शुक्र, पृथ्वी, आणि मंगळ ह्यांशी असणारा संबंध, आणि गुरूचा त्याच्या उपग्रहांशी असणारा संबंध ह्यांचे चमत्कारिक साम्य आहे. बुधादि चार ग्रहांहून आकाराने आणि द्रव्याने सूर्य जसा फार मोठा, आहे तसा गुरु आपल्या चंद्रांहून तितक्या मानाने नाही, तरी पुष्कळ मोठा आहे. सूर्याच्या त्या धाकट्या कुटुंबांत तिसरी पृथ्वी, बाकी तिघांपैकी प्रत्येकापेक्षां व एकंदर तिघांपेक्षा मोठी आहे; तसा गुरूचा तिसरा चंद्र आहे. सूर्यापासून बुधादि चौघांची अंतर ११, २०||, २८,४३ या प्रमाणांत आहे; आणि गुरूपासून त्याच्या चंद्रांची अतर ११, १८,२८,४८ या प्रमाणांत आहेत असे आपण मागें स्वप्नांत (पृष्ठ ११) पाहिलेच आहे. गुरूच्या उपग्रहांस सूर्यापासून प्रकाश आणि उष्णता फार थोडी म्हणजे आपल्या पंशविसाव्या हिश्शाने मिळते; व त्यांतही सूर्याला ग्रहण पुष्कळ वेळां लागते; याचा बराच मोबदला त्यांस गुरूपासून मिळतो. आपल्यास आपला चंद्र जेवढा दिसतो त्याच्या १४०० पट गुरूच्या पहिल्या चंद्रास गुरु दि. सतो. आणि पूर्ण चंद्रापासून आपल्यास जितका प्रकाश मिळतो त्याच्या १५०० पट त्यास पूर्ण गुरूपासून मिळतो. गुरूच्या शेवटच्या चंद्रासही आपल्या चंद्राच्या ६५ पट गुरु दिसतो व आठ पट प्रकाश मिळतो. गुरूला जात्या थाडासा प्रकाश आहे, व त्यामुळे त्यापासून त्याच्या चंद्रांस कांहीं उष्णता सर्वकाळ मिळत असावी. सारांश, गुरु आणि त्याचे चंद्र ही एक लहानशी सूर्यमालाच आहे. आणि गरुच्या उपग्रहांची घनता पाण्याच्या सव्वा पटीपासून सव्वादान पटापयत आहे, म्हणजे गुरूपेक्षा जास्त आहे. ह्या गोष्टी मनांत आणिल्या असता गुरूच्या चंद्रांवर वस्ती असावी, असें अनुमान होतें. RERAN LIRAMPA दिसतासून मिळतो. आपल्यास जितका गुरूच्या पहिल्या MVA सार्वजनिक वाचनाल खेड, (पुणे.)