पान:ज्योतिर्विलास.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. लागतो तो अतिसूक्ष्मपणे काढिला आहे. पहिला १ दिवस १८ तास २८ मिनिटे ३६ सेकंद इतक्या वेळांत एक प्रदक्षिणा करितो. म्हणजे आपल्या चंद्राची एक अमावास्या होते तो त्याच्या १६ होतात आणि तितके वेळां त्याला आणि सूर्याला ग्रहणे लागतात. बाकीच्या उपग्रहांचे प्रदक्षिणाकाळ सुमारे अनुक्रमें ३ दिवस १३ तास, ७ दिवस ४ तास, आणि १६ दिवस १८ तास हे आहेत. ह्या उपग्रहांच्या छायेनें गुरूला व गुरूच्या छायेंत सांपडून त्यांना ग्रहणे लागतात. तसेच, केव्हां ते गुरुबिंबाचे अधिक्रमण करितात व केव्हां त्यांचे पिधान होते. ह्याप्रमाणे चार चंद्रांचे मिळून सोळा चमत्कार होतात. त्यांत प्रतिदिवशी निदान दोन चमत्कार होतात. कधीकधी तेरा पर्यंत होतात. दुर्बिणीतून ते पाहण्याची मोठी मौज असते. आपल्या चंद्राच्या प्रतिप्रदक्षिणेत ग्रहणे होत नाहीत; परंतु गुरूच्या पहिल्या तीन चंद्रांच्या प्रत्येक प्रदक्षिणेत ग्रहणे होतात. चवथ्याची फारशी होत नाहीत. गुरूची कक्षा, त्याच्या उपग्रहांच्या कक्षा, आणि आपल्या पृथ्वीत्री कक्षा, ह्यांमध्ये फार मोठाले कोन होत नाहीत. सुमारे ३ अंशांचे होतात. ह्यामुळे हे चारही चमत्कार वारंवार होतात. कोणत्याही पदार्थाचा प्रकाश आपल्या डोळ्यांत येईपर्यंत त्यास मधला मार्ग कमण्यास काही काळ लागतो असा शोध गुरूच्या उपग्रहांच्या ग्रहणांवरून लागला. सूर्य आणि गुरु यांचा योग असतो तेव्हां पृथ्वीपासून गुरूचे जितकें अं. तर असते त्यापेक्षां षड्भातराच्या वेळी सुमारे १८॥ कोटी मैल, म्हणजे पृथ्वीकक्षेच्या व्यासाइतके, जास्त असते. गुरूच्या उपग्रहांच्या ग्रहणांचा काळ गणितानें काढावा त्याप्रमाणे योगाच्या वेळी ग्रहणे लागतात; परंतु षड्भांतराच्या वेळी सोळासतरा मिनिटें ती उशीरां लागतात असे दिसून आले. व त्यावरून प्रकाशाच्या गतीमुळे असे होते असे सिद्ध झाले. दुसऱ्याही एकदोन मार्गानी प्रकाशाचा वेग काढिला आहे. सूर्यावरून पृथ्वीवर प्रकाश येण्यास ५०० सेकंद लागतात. म्हणजे दर सेकंदास तो सुमारे १८५ हजार मैल चालतो. कोण हा वेग ! ३०० वपीपूर्वी गुरु हा एक लोक आहे, आणि तो आपल्या पृथ्वीहून अति विशाल आहे, हे कोणासही माहीत नव्हते. मग त्याला चंद्र असतील असे कोणाच्या स्वप्नी तरी कोठून येणार ? परंतु पुढे त्यांचा शोध लागला. त्यांस ग्रहणे लागतात असें दिसले, आणि त्यांवरून प्रकाशाला वेग आहे असे समजले. सृष्टचमत्कारांच्या शोधांत असलें म्हणजे एकामागून एक विलक्षण शोध कसे लागत जातात हे ह्यावरून दिसून येते. चार चंद्रांची किती विलक्षण मौज असेल असें मनांत येते. परंतु ही मौज पहाणारे कोण आहेत ? गुरूवर उभे राहण्यास आपल्या पृथ्वीसारखा घनपृष्ठभागच नाही. असला तरी गुरूवर प्राणीच नाहीत. असले तरी गुरूचे वातावरण इतकें दाट आहे की त्यांतून ते चंद्र दिसण्याची मारामार. दिसले तरी आपल्या चंद्रास सूर्याचा जितका प्रकाश मिळतो त्याच्या पंचविसावा हिस्सा त्यांस मिळणार. त्यांत