पान:ज्योतिर्विलास.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंगळ. १३५ केटरच्या पद्धतीप्रमाणे काढलेला मंगळाच्या सर्व पृष्ठभागांचा नकाशा चित्रांक ११ यांत दिला आहे. मंगळावरील कोरड्या जमिनीचे मोठाले प्रदेश व समुद्र ह्यांस निरनिराळ्या ज्योतिष्यांची नांवे देतात; ती सदरहु नकाशांत दाखविली आहेत. मंगळाच्या ध्रुवांजवळ बर्फ असते; व त्याच्या भोवती समुद्र आहे. पृथ्वीवर जमिनीच्या सुमारें तिप्पट पाणी आहे. मंगळावर पाण्याचा प्रदेश जितका, तितकीच सुमारे जमीन आहे. पृथ्वीवर आशिया, युरोप, आफ्रिका ह्या खंडांची जमीन बहुतेक एके ठिकाणी आणि अमेरिका एका ठिकाणी असे आहे; तसेच तान महासागर एका ठिकाणी व दोन एका ठिकाणी आहेत असे म्हटले तरी चालेल. मगळावर तसे नाही. त्यावर पाणी आणि जमीन जिकडे तिकडे वाटलेली आहेत. मंगळावरील कोणी मनुष्य मनांत आणील तर त्यास पाण्यांत पाय न ठेवितां मंगळाभोंवती प्रदक्षिणा करितां येईल; किंवा जमिनीवर न उतरतां, परंतु जमीन दिसेनाशी होईल इतके लांब न जातां, पाण्यांतून सर्व प्रवास करितां येईल; त्या प्रवासात कधी तर दोहों बाजूंनी जमीन दिसत असेल. लांब परंतु अरुंद असे लहान लहान समुद्र मंगळावर बरेच आहेत. त्यांची लांबी बरीच नसती, तर ते मनुष्यकृतीचे आहेत की काय असा संशय आला असता. एकंदरीत मंगळाचें पृथ्वीशी पुष्कळ साम्य आहे. यावरून त्यावर पृथ्वीप्रमाणे प्राणी असतील असे अनुमान होते. पृथ्वीच्या उष्णता मंगळास मिळते हे खरे. तरी उष्णतेपासून कमजास्त परिणाम होणे हे वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते, असें हल्ली सिद्ध झाले आहे व तसा आपल्यास अनुभवही आहे. मंगळ आणि पृथ्वी यांचे पुष्कळ साम्य दिसते, तरी केवळ पृथ्वीसारखीच स्थिति मंगळावर असेल असें म्हणवत नाही. मंगळाचे वर्ष आपल्या दुपटीचे जवळ जवळ आहे. पृथ्वीवर जर इतके मोठे वर्ष झाले तर सर्व वनस्पतींची स्थिति चमत्कारिक होईल. त्यांस फुले व फळे येणे वगैरे गोष्टींच्या काळांत अव्यवस्था होईल. पृथ्वीच्या द्रव्याच्या नवमांश मंगळाचे द्रव्य आहे. परंतु त्याच्या पृष्ठभागाचे मध्यबिंदूपासून अंतर आपल्याहून कमी आहे. यामुळे पृथ्वी आणि मंगळ यांच्या पृष्ठभागच्या पदार्थावरील आकर्षणांचे गुणोत्तर २७:१० आहे. म्हणजे पृथ्वीवर जो पदार्थ २७ शेर भरतो तो मंगळावर १० शेर भरेल. यामुळे प्राणी आणि वनस्पति यांवर आकर्षणाचे घडणारे परिणाम पृथ्वी आणि मंगळ यांचे भिन्नभिन्न आहेत. तसेच मंगळाच्या हवेवर दाबही पृथ्वीच्या हवेहून कमी आहे. पृथ्वीवर भारमापकांत पारा ३० इंच असतो; तो मंगळावर सुमारे ११ इंच असेल. डोंगरावर जावे किंवा विमानांत बसन वर जावे, तसतसा हवेचा दाब कमा हाता. म्हणून तेथे मनुष्याच्याने राहवत नाही, त्याप्रमाणे पृथ्वीवरील प्राणी मंगळावरील हवेंत राहूं शकणार नाहीत. असे आहे तरी मंगळावरील सर्व परिस्थिति आपल्यास माहीत नाही. परंतु