पान:ज्योतिर्विलास.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंगळ. त्रिभांतराच्या दिवशी ग्रह सुमारें मध्यरात्री उगवून सूर्योदयी मध्यान्हीं येतो व पुढे उत्तरोत्तर षड्भांतरापर्यंत मध्यरात्रीपूर्वी उगवू लागतो. म्हणून ग्रह पहाटेस पश्चिमाधी दिसेल असे लिहिले आहे, तेव्हां तो मध्यरात्रीपूर्वी केव्हां तरी पूर्वार्धीही दिसेल असे समजावें. दोन तीन वेळां अनुभव घेतल्यावर या गोष्टी सहज समजतील. मंगळाचा अमाप्रदक्षिणाकाल सुमारे ७८० दिवस आहे. म्हणून षड्भांतर, त्रिभांतर, वक्रत्व, मार्गित्व, अस्त, उदय, यांच्या एकदांच्या वेळेत २ सौरवर्षे ५० दिवस मिळवावे म्हणजे त्या त्या गोष्टींची पुढील वेळ सुमाराने निघते. मंगळाचा व्यास पृथ्वीच्या अर्ध्याहून थोडा जास्त आहे. यामुळे मंगळावर जमीन आणि पाणी मिळून आपल्या चतुर्थांशाहून थोडेसें जास्त इतकेंच आहे. त्याचा आकार पृथ्वीच्या सुमारें षष्ठांश आहे आणि द्रव्य नवमांश आहे. मंगळाच्या पृष्ठभागावरील स्थाइक-चिन्हें जशी स्पष्ट दिसतात, तशी इतर कोणत्याही ग्रहावरील दिसत नाहीत. यामुळे मंगळाचा अक्षप्रदक्षिणाकाल अगदी सूक्ष्म काढितां आला आहे. मंगळावरील दिवस, आपले २४ तास ३७ मिनिटें २३ सेकंद इतका आहे. म्हणजे आपल्याहून सुमारे दीड घटिका मोठा आहे. व मंगळाची सूर्यप्रदक्षिणा आमच्या ६८७ दिवसांत होते इतके त्याचे वर्ष आहे. यांत त्याचे सुमारे ६६९॥ दिवस होतात. त्याचा एकेक सौर महिना आमच्या सुमारे १७ दिवसांचा आहे. त्याची कक्षा आणि विषुववृत्त ह्यांच्यामध्ये सुमारे २७ अंशांचा कोन आहे. म्हणजे आपल्यापेक्षा थोडाच जास्त आहे. यामुळे त्यावर हवेचे फेरफार आमच्याप्र. माणेच बहुतेक होत असतील. मात्र तेथील एकेक ऋतुकाल आपल्या दुपटीच्या जवळ जवळ आहे. परंतु तेथे सूर्याचा प्रकाश व उष्णता आपल्या सुमारे आहे. यामुळे एकंदरीत कांही गोष्टींत परिणाम बहुधा सारखेच होत असतील. मंगळाला दोन उपग्रह आहेत, असा शोध इ० स० १८७७ या वर्षी ली. गला. हे उपग्रह फारच लहान आहेत. एकाचा व्यास सुमारे १५।२० मैल आहे. दुसरा त्याच्या आंत आहे. व त्याहून बराच तेजस्वी आहे. त्याचा व्यास सुमारे ३०१४० मैल आहे. ग्रह व उपग्रह ह्यांत ह्याहून लहान दुसरे कोणी नाहीत. ह्यांची मंगळापासन अंतरेही फार थोडी आहेत. आंतला सुमारे सहा हजार मैल व बाहेरचा समारे साडेचवदा हजार मैल अंतरावर आहे. हे मंगळाभोवती फार जलद फिरतात. आंतला ७ तास ३९ मिनिटें इतक्या वेळांत फिरतो व दुसऱ्याची प्रदक्षिणा ३० तास १८ मिनिटांत होते. आपल्या चंद्राचा व्यास आपल्यास जेवढा दिसतो त्याच्या सुमारे पाऊणपट व्यास मंगळावरील लोकांस आंतल्या चंद्राचा दिसत असेल. व आपल्या चंद्राच्या निमे प्रकाश त्याचा पडत असेल. समारें दर आठ तासांनी पुन्हा पुन्हां दिसणारा व तितक्या थोड्या वेळांतही क्षयवृद्धि पावणारा चंद्र पाहून मंगळावरील लोकांस फारच मौज वाटत असेल. मंगळाचा दुसरा चंद्र फारच लहान आहे. तो आपल्या चंद्राच्या सुमारे पन्नासाव्या हिश्शाने दिसत असेल. आंतला उपग्रह मंगळाच्या पृष्ठभागापासून फक्त ४ हजार मैल दूर आहे. आम