पान:ज्योतिर्विलास.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२९ शुक्र. रिक स्थिति होत असेल ! आपल्यास पृथ्वीवरील दृष्टीने ही चमत्कारिक वाटते. परंतु ईश्वरी दूरदृष्टीपुढे आपली दृष्टि किती ! आपल्यास जसा चंद्र आहे तसा शुक्रास नाही. तथापि बऱ्याच गोष्टींनी शुक्र हा पृथ्वीसारखा आहे. तेव्हां त्यावर पृथ्वीप्रमाणे प्राणी नसतील असें म्हणवत नाही. पृथ्वीपेक्षां सूर्याला तो जवळ आहे. सूर्यापासून पृथ्वीचे अंतर आणि शुक्राचे अंतर यांचे गुणोत्तर ७३ : १०० आहे. यामुळे ७३ च्या वर्गाच्या जितके पट १७० चा वर्ग आहे तितके पट, म्हणजे सुमारे पृथ्वीवरच्याच्या दुप्पट सूर्याचा प्रकाश शुक्रावर पडतो. आपल्यास सूर्य जेवढा दिसतो, त्याच्या दुप्पट शुक्रावरील लोकांस दिसेल. अर्थात् पृथ्वीवरच्या दुप्पट उष्णता शुक्रावर आहे. मुबईपेक्षां पुण्यास उन्हाळ्यांत दहा बारा अंशच उष्णता जास्त असते. पुण्याहून पांच चार अंश जास्त व-हाडांत असते. परंतु कोकणांतले अनभ्यस्त लोक उन्हाळ्यांत पुण्यास आले तर त्यांस 'त्राहि त्राहि' होते. पुणेकरांस व-हाडांतला उन्हाळा असह्य होतो. आपल्या प्रांतांत हल्लीच्या दुप्पट उष्णता उन्हाळ्यांत झाली तर सर्वांस स्वर्गाचीच वाट धरावी लागेल. मग शुक्रावर प्राणी कसे राहत असतील, असें मनांत येते. परंतु शुक्रावरील स्थिति प्राण्यांस सर्वथा अयोग्यच आहे असें नाहीं. ईश्वरी योजना कोणास समजणार ? महासागराच्या तळाशी पाण्याचा दाब इतका आहे की, जमिनीवर कोणत्याही प्राण्यांचा तेथे अगदी चुराडा होऊन जाईल. यामुळे तेथे प्राणी नसावेत असे काही काळापूर्वी वाटत होते. परंत तेथेही प्राणी राहतात असा हल्ली शोध लागला आहे. तेथल्या अतिगाढ अंधकारांत पदार्थ दिसण्याजोगी चक्षरिद्रिये त्यांस आहेत. तेच प्राणी वर काढू लागले तर पाण्याच्या पृष्ठभागावर पोहोचण्यापूर्वीच ते मरतात. परंतु ते आपल्या जन्मस्थानी सखाने राहतात. यावरून पृथ्वीवरील प्राण्यांप्रमाणे प्राणी शुक्रावर असण्याचा संभव फारसा नाही, तरी शुक्रावरील उष्णता आणि थंडी सहन करण्याजोगे प्राणी ईश्वराने तेथे उत्पन्न केले असतील. नाही कोणी म्हणावे ? ज्या ग्रहांस चंद्र नाही, त्यांच्या आकाशांत त्याच्याबद्दल काही तरी योजना ईश्वराने करून ठेविली आहे. आपणांस गुरूचें तेज जेवढे दिसते, त्याच्या दहा बारा पट तेजाने कधी कधी बुधावरील आकाशांत शुक्र प्रकाशतो. व तेथे आपली पृथ्वीही फार तेजस्वी दिसते. शुक्रावरील लोकांस इतके आनुकूल्य नाही, तरी आपणांस गुरु किंवा शक जेवढा तेजस्वी दिसतो, त्याहून पुष्कळ तेजस्वी आपली पृथ्वी त्यांस दिसते आणि आपल्यास चंद्रप्रकाश जितका सांपडतो तितका नाहीं तरी पूर्णचंद्राच्या विसावा हिस्सा प्रकाश शुक्रावरील लोकांस आपली पृथ्वी आणि चंद्र ह्यांपासून प्राप्त होतो. नाही पृथ्वी त्यास किंवा शक जतात. शुक्रावरीलाशांत शुक्र पई दिसते, त्याच्या