पान:ज्योतिर्विलास.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ ज्योतिर्विलास. तात; असें अलीकडील सूक्ष्मवेधांवरून दिसून आले आहे. पृथ्वीवरील वातावरणांत क्षितिजाजवळ किरणांचें वक्रीभवन ३४ कला होते. शुक्राच्या वातावरणांत ४४ कला होते. वातावरणामुळे अधिक्रमणाच्या वेळी दुर्बिणीतून त्याची कडा किंचित् प्रकाशित दिसते. शुक्राचे वर्णलेख घेतले आहेत, त्यावरून शुक्राचे वातावरण पृ. थ्वीवरील वातावरणाहून निराळे असेल, अशी काही चिन्हें दिसत नाहीत. शुक्राचे तेज फार असल्यामुळे दुर्बिणीतून त्याचे वेध घेण्यास थोडीशी अड. चण पडते. तसेंच, शुक्राचे वातावरण फार घन आहे व त्यांत दाट अभ्रे असतात, यामुळे त्याच्या पृष्ठभागावरील जमीन, पाणी, पर्वत, इत्यादिकांच्या स्थायी-खुणा कांही दिसत नाहीत. परंतु शुक्रावर डोंगर असावे असे अनुमान आहे. त्यास अक्षप्रदक्षिणेला किती काळ लागतो हे खात्रीलायक समजत नाही. आजपर्यंत या कामी अनेक वेध होऊन बरेच मतभेद झाले आहेत. शुक्रावरील दिवस सुमारे २३ तास २१ मिनिटें आहे, असा हल्ली अजमास आहे. त्याचे वर्ष आपल्या २२५ दिवसांचे आहे. व त्याचा दिवस आपल्याहून थोडासा लहान असल्यामुळे त्याचे वर्षांत त्याचे सुमारे २३० दिवस होतात. वर्ष लहान असल्यामुळे प्रत्येक ऋतुही आपल्याहून लहान असला पाहिजे. आपल्याहून तेथे उष्णता फार आहे. यामुळे वनस्पतींची वाढ आपल्याहून तेथे फार असेल. तेव्हां मोठ्या वर्षाची तेथे गरज नाही. पृथ्वीची कक्षा आणि विषुववृत्त यांत २३॥ अंशांचा कोन आहे, तसा श. काचा हा कोन सुमारे ५० अंश आहे असा अजमास आहे. परंतु त्याविषयी खात्री नाही. हा कोन इतका मोठा असेल तर शुक्रावरील हवेत आपल्याहून फारच फेरफार होत असतील. व तेही चमत्कारिक तव्हेचे असतील. . पुणे येथे मे महिन्याच्या १३ व्या तारखेस सूर्य दोनप्रहरी डोकीवर येतो. त्यापुढे सुमारे २।। महिने दोनप्रहरी खस्वस्तिकाच्या उत्तरेस असतो. जुलईच्या ३० व्या तारखेस पुनः डाकीवर येतो. या दिवसांत पुण्यास फार उन्हाळा असतो. पुढे सूर्य दक्षिणेस जातो. दिसेंबरच्या २१ व्या तारखेस तो मध्यान्हीं येतो, तेव्हां खस्वस्तिकाच्या दक्षिणेस ४२ अंश म्हणजे दक्षिणेस सुमारे अर्ध्या आकाशांत असतो. या वेळी पुण्यास फार थंडी असते. शक्रावरील पुणे-करांस आमच्या पुणेकरांपेक्षा मोठा व दुप्पट कडक उन्हाळा काढावा लागतो. आणि दिसेंबरांत त्यांना सूर्य आकाशांत अगदी खाली म्हणजे क्षितिजापासून कायतो २२ अंशांवर दिसतो. म्हणजे सुमारे लदनास हिवाळ्यांत जितकी थंडी असते, तितकी शकावरील पुण्यास असते. शुकावराल लदनांत हिवाळ्यांत कित्येक दिवस सर्य दिसतही नाही. आणि उन्हाळ्यात तर पुण्याइतका उन्हाळा असतो. शकावरील प्रत्येक शीतकटिबंध ५० अंश असला पाहिजे, आणि उत्तरदक्षिण उष्णकटिबंधही ५० अंश असले पाहिजेत. अस झाल की समशीतोष्ण कटिबंध मळीच नाही, आणि मध्ये १० अंशांत काटवध आणि शीतकटिबंध या दोहोंतली हवा आहे. आणि वर्षे लहान असत्यामुळ ह फरफार आपल्याहून थोड्या काळांत होणार. तेव्हां किती चमत्का