पान:ज्योतिर्विलास.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शुक्रा १२७ इ०स० १७६१ जून २११७ दिसेंबर ११ १७६९ जून २१२५८ १८७४ दिसेंबर ९ २२४७ जून ११ १८८२ , ६ २२५५ , ९ या अधिक्रमणांवरून सूर्याचे अंतर काढितात, हे मागें सांगितलेच आहे. शुक्र नियमितकाळाने सूर्यबिंबाचे अधिक्रमण करितो ही गोष्ट केप्लरच्या पूर्वी कोणास ठाऊक नव्हती. इ० स० १६३१ या वर्षीचे अधिक्रमण प्रथम त्याने वर्तविले. परंतु युरोपांत ते रात्रीचे होते, यामुळे त्याचा वेध कोणी घेतला नाही. सन १६३९ चे अधिक्रमण इंग्लंदांतल्या एका मनुष्याने पाहिले. परंतु सूर्याचे अंतर काढण्यास त्याचा उपयोग झाला नाही. पुढल्या अधिक्रमणांवरून सूर्याचें अंतर उत्तरोत्तर सूक्ष्म समजले. सन १८७४ चे अधिक्रमण आपल्या देशांत सकाळी दिसले. ते पुष्कळांनी पाहिले असेल. सन १८८२ चे आधिक्रमण या देशांत दिसावयाचे नव्हते. शुक्राचे अधिक्रमण नुसत्या डोळ्यांनी दिसते. सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस जातो. चंद्रशुक्रांमुळे होणारी सूर्यग्रहणे काजळाच्या भिंगाशिवाय नुसत्या डोळ्यांनी पाहण्याची एक युक्ति आहे. घराच्या छपराला किंवा मांडव वगैरेला लहान लहान भोंके असली तर त्यांतून सूर्याचा प्रकाश पडतो. हा कवडसा अगदी वाटोळा असतो. सूर्यग्रहणाच्या वेळी ह्या कवडशास ग्रहण लागलेले दिसते. मात्र त्याची दिशा उलटी असते; सूर्यबिंबाचा उत्तरभाग ग्रस्त असला तर ह्यांत दक्षिण भागास ग्रहण लागलेले दिसते. ह्या रीतीने ग्रहण इतकें सूक्ष्मपणे पाहण्यास सांपडतें की, ते लागलें केव्हां, सुटलें केव्हां, हेही सूक्ष्मपणे समजते. एकाद्या अंधाऱ्या खोलीत एक पांढरा पडदा टांगावा. आणि खोलीला कोठे तरी एक लहानसा झरोका करून त्यांतून त्या पडद्यावर सूर्याचा प्रकाश घ्यावा, म्हणजे त्यांत शुक्रादिकांमुळे होणारें सूर्यग्रहण चांगले दिसेल. लहानशा दुर्बिणीतून सूर्यबिंब एकाद्या पडद्यावर घेतले तर त्यांतही ग्रहण चांगले दिसेल. खुधाचे अधिक्रमण या रीतीने पहावे. शुक्राचा बारीकसा ठिपका सूर्यबिंबावरून जातांना दिसतो एवढ्यावरून सू. योचें अंतर को काढितात, सन १८७४ आणि सन १८८२ ह्या वर्षीची अधिक्रमणे पृथ्वीवर कोठे केव्हां किती वेळ दिसली, त्यांचे वेध घेण्याची व्यवस्था इंग्लिश, फेच, जर्मन, अमेरिकन इत्यादि राष्ट्रांनी कशी केली होती, या विषयाची चर्चा पूर्वी किती वर्षे कशी चालली होती, वेध कसे घेतले, त्यावरून शेवटी काय सिद्ध झाले, पते होण्यास कितीक विद्वानांस कसे व किती गणित किती वर्षे करावे लागलें, ह्याचे सविस्तर वर्णन केले तर एक स्वतंत्र ग्रंथ होईल. शुक्रावर वातावरण आहे; ते फार दाट आहे; व त्यांत फार दाट अभ्रे अस