पान:ज्योतिर्विलास.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ ज्योतिर्विलास. शुक्र. रात्री प्रकाशणाऱ्या सगळ्या आकाशस्थ ज्योतीमध्ये शुक्रासारखें तेजस्वी आणि शुक्रासारखें सुंदर दुसरे कोणी नाही. पाश्चात्य लोकांत शुक्राला " सौंदर्याची देवता" अथवा "प्रीतीची देवता" अशा अर्थाचें वीनस' असें नांव आहे, ते यथार्थ आहे. उपोद्घातांतच शुक्राची आणि आपली ओळख झाली आहे. ह्याची ओळख करून घ्यावयास दुसऱ्या कोणाची गरज नाही, असे म्हटले तरी चालेल. आपल्या देशांत बहुधा आबालवृद्धांस शुक्र माहीत आहे. काळोख्या रात्री शुक्राचे थोडेसे चांदणे पडते हे पुष्कळांनी पाहिलेच असेल. शुक्राहून चंद्र फार मोठा दिसतो यामुळे त्याचे चांदणे जास्त पडते इतकेच. परंतु जात्या म्हटले तर चंद्रापेक्षा शुक्राचें तेज जास्त आहे. सूर्यापासून १२ अंशांवर चंद्र जाईल तेव्हां त्याचे दर्शन होते. शुक्र तर सूर्यापासून ८ अंशांवरच दिसू लागतो हे मागच्या प्रकरणांत आपण पाहिलेच आहे. सूर्याच्या प्रकाशास न जुमानतां दिवसासही दिसणारा सर्व ग्रहांत एक शुक्रच. तो पहाटेस उगवतो तेव्हां सकाळी सुमारे ९ वाजल्यानंतर मध्यान्हीं आलेला दिसतो. सायंकाळी पश्चिमेस दिसतो तेव्हां दिवसास सुमारे ३ वाजल्यानंतर मध्यान्हीं येतो. चंद्र त्याच्या जवळ असला तर दिवसास तो सहज दिसतो. आणि एक दिवस पाहिला म्हणजे पुढे त्या खुणेवरून चंद्र जवळ नसतांही दिसतो. शुक्र एकदां सायंकाळी पश्चिमेस किंवा पहाटेस पूर्वेस दिसू लागला म्हणजे सुमारें <| महिने दिसतो. मग त्याचा अस्त होतो. पुढील ३ वर्षात कोणत्या दिशेस त्याचा उदय कधी होईल, सूर्यापासून त्याचा परमइनापगम कधी होईल, आणि मग अस्त कोणत्या दिवशी होईल हे खाली सांगितले आहे. उदय झाल्यापासून अस्त होईपर्यंत तो रोज दिसेल हे उघड आहे. पूर्वेस पहाटेस पश्चिमेस सायंकाळी १८९३ मार्च १७ अस्त. १८९३ मे २८ उदय. १८९३ डिसेंबर ६ परमइनापगम. १८९४ फेब्रुआरी १७ उदय. १८९४ फेबुआरी ११ अस्त. , अप्रील २७ परमइनापगम. " नोव्हेंबर २ अस्त. १८९५ सप्टंबर २३ उदय, १८९५ जानुआरी १ उदय. , नोव्हेंबर २९ परमइनापगम. , जुलई ११ परमइनापगम, सप्टेंबर १३ अस्त. शुक्राचा इनापगम परम होतो त्याच्या मागेपुढे काही दिवस तर तो फार तेजस्वी दिसत असतो. सुमारे तेरा चवदा महिन्यांनी गुरुशुक्रांची एकदा गांठ पडते. शुक्रापेक्षां गुरूचे तेज कमी आहे, तरी गुरु पुष्कळ तेजस्वी आहे. यामुळे ते दोघे एके ठिकाणी येतात तेव्हां त्यांतला गुरु कोणता आणि शुक्र कोणता हे ओळखण्या सुली दिसत असते की मुहिता मिली हे एकदा पो