पान:ज्योतिर्विलास.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहांचे उदयास्त म्हणजे दर्शनादर्शनें. १२३ शास्त्रकारांनी सांगितले आहे. त्याप्रमाणे एकदोन दिवस टाकावे हे बरे. अस्तोदयाच्या संधीस दुर्बिणीतून शुक्र पाहण्याची मजा असते. ह्या पुस्तकाच्या वाचकांस अस्तोदय पाहण्याची स्फूर्ति होऊन ते सायन पंचांगाप्रमाणे किंवा इतर कोणत्या तरी पंचांगाप्रमाणे उदयास्तकाल कितपत अनुभवास येतात हे पाहून मला कळवितील तर त्यांचे आमच्या ज्योतिःशास्त्रावर उपकार होतील. हे पहा. ण्यास दुर्बिणीची गरज नाही. अमुक ग्रहाचा उदय किंवा अस्त अमुक दिवशी अमुक दिशेस होईल असें पंचांगांत लिहिलेले असते त्या संधीस पांच चार दिवस सूर्यादयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर घटका दोन घटका मोडल्या म्हणजे पुरे. SERAL LIBRAR AENE सावजनिकलकर खेड, (युगे.)