पान:ज्योतिर्विलास.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. ऋग्वेदांतलें वर्णन वर दिले आहे त्यासंबंधे दोन तीन गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. ते वर्णन अति प्राचीन असून अति भीतिदर्शक नाही. मीड लोकांसारखी आमच्या ऋषींची अवस्था झालेली दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की, अत्रि मात्र सूर्यास मुक्त कारते झाले, इतरांचे सामर्थ्य झाले नाही, याचा अर्थ काय ? सूर्यग्रहणाचे ज्ञान अत्रि गोत्रांतील ऋषींस होते, इतरांस नव्हते, असा त्याचा अर्थ दिसतो. आणि अत्रीस ज्ञान होते याचा अर्थ काय ? ग्रहण लागेल हे सर्वांस समजते. तेव्हां प्राचीन खाल्डियन लोकांस ग्रहणे पडण्याचा नियम माहित होता, तसा अत्रीस माहित असावा असे दिसते. तिसरे असे की, स्वर्भाननें तमामें सर्यास झांकलें असें वर्णन आहे. तेव्हां स्वर्भानु निराळा आणि तम निराळे असें झाले. स्वर्भानूने सूर्यास गिळिले असे वर्णन नाही. यावरून ग्रहणाच्या खऱ्या कारणाची कल्पना त्या वेळी असावी असे दिसते. महाभारतांत जागोजाग वर्णने आहेत, त्यांतही ग्रहण पाहूनच लोक भिऊन गेले असें वर्णन कोठेही नाही. ग्रहणाचे परिणाम वाईट होतील, अशी मात्र भीति लोकांस पडत असे. भारती युद्धाच्या वेळी एका महिन्यांत दोन ग्रहणे झाल्यामुळे ते लोकांनी दुश्चिन्ह मानिले. सारांश, आमच्या लोकांस प्राचीन काळापासून ग्रहणाचा पुष्कळ परिचय आहे, व त्यासंबंधे वास्तविकज्ञान असावे असे दिसून येते. अमक्या वर्षी अमुक ग्रहणे झाली, असे शके ४०० च्या पूर्वीचे लेख आमच्या देशांत सांप्रत उपलब्ध नाहीत हैं खरें. तरी खाल्डियन लोकांची प्राचीन ग्रहणे चंद्राची गति ठरविण्यास जशी हिपार्कस याच्या उपयोगी पडली, तशी प्राचीन ग्रहणे आमच्या देशांतील ज्योतिष्यांच्या उपयोगी पडली असतील असे दिसते. ग्रहणावरून चंद्रसूर्यांच्या गति साधल्या असें आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी स्पष्ट लिहिले आहे. व तशीच परंपरा त्यांच्या पूर्वीचे जे ग्रंथ आहेत त्यांची असली पाहिजे. जेवतांजेवतां अकस्मात् ग्रहण लागले आणि तेणेकरून जेवणही सुचत नाही, अशी स्थिति आमच्या लोकांची कधी झाली नसेल, व पुढे व्हावयाची नाही. ग्रहणांच्या काळाचें एक चक्र आहे. १८ सौर वर्षे आणि ११ दिवस इतक्या काळांत जी जी ग्रहणे ज्या क्रमाने होतात तीच बहुधा त्याच क्रमाने पुढे तितक्या काळांत होतात. चांद्रसौरमानाने कधी ह्या काळांत १८ वर्षे होतात, कधी १८ वर्षे आणि एक चांद्रमास होतो.. सूर्यचंद्र हे राहुबिंदूंत एकदां आल्यापासून पुन्हा सुमारे इतक्या काळाने ते एकाच वेळी फार थोड्या अंतराने त्या स्थळी येतात. त्यांच्या स्थितीत काही कलांचे अंतर पडते. यामुळे, व चंद्राची स्पष्टगति थोडी कमजास्त होते यामुळे, एका चक्रांतले एकादें ग्रहण पुढल्यांत कमी होते आणि ए. कादें वाढते. सुमारे १००० वर्षांनी पुष्कळ फरक पडतो. एका चक्रांतल्या ग्रहणांचे दुसन्या चक्रांतल्यांशी कसे साम्य असते वगैरे गोष्टी समजण्याकरितां दोन चक्रांच्या काही वर्षांतली ग्रहणे पुढल्या पानावर दिली आहेत. त्यांत पुणे, मुंबई

  • याने शके १५० मध्ये ब्रह्मसिद्धांत नामक ग्रंथ रचिला.