पान:ज्योतिर्विलास.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. चंद्रसूर्यांमध्ये ६ अंश अंतर झाले म्हणजे एक करण होतें.. बव, बालव इत्यादि करणांचे पर्याय शुक्लप्रतिपदेच्या उत्तरार्धापासून ८ होतात; आणि पुढे शकुनि वगैरे ४ करणे असतात, मिळून महिन्यांत ६० करणे होतात. सायननिरयन पंचांगांतली करणे एकच असतात. योग भिन्न असतात. पंचांगाची पांच अंगें झाली. हल्ली इतर पुष्कळ उपयोगी गोष्टीही पंचांगांत देतात. एकादशीचे उपोषण कधी, श्रावणी कधी, वगैरे गोष्टी धर्मशास्त्रावरून देतात. त्यांचा ज्योतिषगणिताशी संबंध नाही. धर्मशास्त्राच्या ग्रंथांत कोठे कोठे मतभेद पडतो, म्हणून दसरा आज करावा की उद्यां करावा असे वाद कधी कधी पडतात. अर्थात् ह्या वादाला कारण पंचांगांतली चूक हे नव्हे. आमच्या प्रांतांतल्या पंचांगांत पंध्रवड्याच्या पृष्ठाच्या उजव्या अंगास वरील कोपऱ्यांत रवि, चंद्र इत्यादि ग्रहांची नांवें संक्षेपाने देऊन त्यांखाली आंकडे दिलेले असतात. त्यांवरून पूर्णिमा किंवा अमावास्या या दिवशी प्रातःकाली आकाशांत ते ग्रह कोठे आहेत हे समजतें. रवीच्या खाली ११२०१४६।१२ असे आंकडे आहेत असे समजा. याचा अर्थ रवि एक राश भोगून दुसऱ्या राशीत २० अंश ४६ कला १२ विकला या जागी आहे. राशीचे अंश ३० होतात. मंगळादि पांच ग्रहांतील कोणाच्याही स्थितीतून सूर्याची स्थिति वजा केली तर तो ग्रह सूर्यापुढे किती आहे हे समजेल. बाकी राहील तीतील राशीच्या दुपटी इतके तास आणि अंशांच्या चौपट मिनिटे इतका काळ दोनप्रहरपासून जाईल तेव्हां ते ग्रह मध्यान्हीं येतील असे स्थूलमानाने समजावें. प्रभव इत्यादि संवत्सरांचा आरंभ आपलेकडे चैत्राच्या आरंभीच होतो. परंतु हे संवत्सर मूळचे बार्हस्पत्य मानाचे आहेत. बृहस्पतीला एक राशि क्रमण्यास मध्यममानाने सुमारे ३६१ दिवस लागतात. इतक्या कालांत एक बार्हस्पत्य संवत्सर होतो. यामुळे सुमारे ८५ सौरवर्षीत ८६ बार्हस्पत्य संवत्सर होतात. म्हणजे एका संवत्सराचा क्षय होतो. ही पद्धति नर्मदेच्या उत्तरेस अजून चालते. आपलेकडेही शके ७२६ पर्यंत चालत होती. पुढे बंद झाली. म्हणजे क्षयसंवत्सर मानण्याची रीति बंद झाली. यामुळे उत्तरेकडील संवत्सर आमच्यापेक्षां हल्ली १२ नी पुढे आहे. पूर्वी गांवोगांवचे जोशी पंचांगें करीत असत. हल्ली, मुंबई, पुणे येथील पंचार्ग सर्व महाराष्ट्र देशांत चालतात. परंतु वस्तुतः ज्या त्या ठिकाणचे पंचांग निराळ असणे चांगले. निदान दर जिल्ह्यास तरी निराळे पाहिजे. थोड्याशा युक्तीने एका ठिकाणचे पंचांग दुसऱ्या स्थळी उपयोगी पडेल. दोन स्थलांच्या रेखांशांचे अंतर काढावे. दर अंशास १० प म्हणजे ४ मिनिटें इतकें अंतर दोहोंच्या वेळांत पडते. पंचांगाच्या स्थलाच्या पूर्वेस इष्ट स्थल असेल तर ते अंतर पंचांगांत दिलेल्या वेळेत मिळवावे; आणि पश्चिमेस असेल तर वजा करावें. उदाहरण, पुण्याच्या पंचांगांत एकादशी ४० घटका १० पळे आहे. पुणे आणि बार्शी