पान:ज्योतिर्विलास.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पंचाग. मान ३६५ दिवस १५ घटका २३ पळे आहे. रेवतीपासून सूर्य निघाल्यापासून पुन्हां तेथे येण्यास इतका काल लागतो. ह्या कालास नाक्षत्र सौरवर्ष म्हणतात. ग्रहलाघवी पंचांगाचे वर्ष ३६५ दिवस १५ घटका आणि ३१ पळे आहे. - आकाशांत सूर्याचे दक्षिणायन किंवा उदगयन प्रत्यक्ष ज्या दिवशी होते त्याच दिवशी सायनपंचागांत असते. व त्याच दिवशी त्यांत मकर किंवा कर्क संक्राति होते. वसंतसंपाती सूर्य येतो तेव्हां नेहमी वसंतऋतु असावयाचा. तेव्हांच सायनपंचागांतली मेष संक्रांति व चैत्र येतो. म्हणून सायन मानाने चैतांत नेहमी वसंतऋतु येईल. केरोपंती किंवा ग्रहलाघवी पंचांगांप्रमाणे कालांतराने चैत्रांत पावसाळा येईल. ही गोष्ट स्वतः केरोपंतांनी कबूल केली होती व सर्व गणितज्ञ कबूल करितात. तिथीचा संबंध आरंभस्थानाशी नाही, यामुळे तिन्ही प्रकारच्या पंचांगांच्या तिथि जमतात. कधी काही घटकांचा फरक पडतो, तो जुन्या पंचांगांत रविचंद्रांच्या गतीत थोडी चूक आहे म्हणून पडतो. ग्रहणास फरक यामुळेच पडतो. ग्रहांच्या गति हल्लीच्या शोधाप्रमाणे बिनचूक घेतल्या म्हणजे ग्रहणे, युति इत्यादि गोरी जन्या पंचांगाच्या मानाने देखील बरोबर अनुभवास येतील. त्यास केरोपंती निरयन किंवा सायन मानच पाहिजे असे नाही. परंतु जुन्या पंचांगाचें वर्षमान सायन नाहीं आणि नाक्षत्रही नाही. ते बदललेच पाहिजे. आरंभस्थानी ग्रह आला म्हणजे अश्विनीत आला. तिन्ही पचागांचे आरंभस्थान भिन्न, यामुळे तिहींच्या पडतो. ग्रहलाघवी पंचांगाहून केरोपंतीत हल्ली सुमारे पाव नक्षत पढ़ें असते. व सायनांत १॥ नक्षत्रे पुढे असतात. न पंचांगांतली नक्षत्रे विभागात्मकच आहेत. तरी पंचागांत जो ग्रह त्याच्या तारांच्या आसपास किंवा कदाचित् थोडा मागेपुढे तो दिसतो. . सायन नक्षत्रं निराळी आणि तारात्मक निराळी. यामनाया ग्रह यांच्या युति केव्हा होतील हे सायन पंचांगांत निक पंचांगाप्रमाणे ऋतु सर्वकाळ बरोबर मिळतील; सायन नक्षत्रे आणि मक नक्षत्रे यांचा मळ राहणार नाही. निरयन पंचांगांत नक्षत्रे आणि तारा यांचा मेळ बहुधा असतो. परंतु ऋतु चुकतात. व पुढे फारच चकतील. योग म्हणजे बेरीज. चंद्रसूर्याच्या गतीची बेरीज १३ अंश २० कला हो लागतो, तितक्यांत एक योग होतो. हे योग २७ आहेत. तिथिनक्षत्रांचा आकाशांतल्या स्थितीशी संबंध आहे, तसा योगांचा नाही. शके १५० च्या पूर्वी हे नव्हते; त्यानंतर पंचांगांत आले. असे माझे मत आहे. चंद्र आणि सूर्य यांची क्रांति समान होते तेव्हां व्यतिपात आणि वैधति हे होत असतात. त्यांस महापात म्हणतात. हे पंचागांत निराळे दिले असतातच. हे मात्र प्राचीन आहेत. हे सुमारे १३ दिवसांच्या अंतराने होतात. करण म्हणजे तिथीचे अर्थ. चांद्रमासांत ३० तिथी व ६० करणे असतात. ज्य