पान:ज्योतिर्विलास.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. त्यांत धनिष्ठांच्या आरंभी सूर्याचे उदगयन होते असे सांगितले आहे. शके ४२७ मध्ये उत्तराषाढांच्या दुसऱ्या चरणी उदगयन होत असे, असे वराहमिहिराने सांगितले आहे. सांप्रत मूळांच्या तिसऱ्या चरणामध्ये होते. अयनाच्या ह्या गतीस अयनचलन म्हणतात. ही गति फार थोडी आहे. वर्षात सुमारे ५० विकला आहे. इतकीच संपाताचीही गति- आहे. आमच्या प्राचीन ज्योतिषग्रंथांतील वपीचें मान जितके आहे, तितक्या कालांत संपातगति सुमारे ५९ विकला होते. परंतु त्या ग्रंथांत ती ६० विकला मानिली आहे. सूर्यसिद्धांतादि ग्रंथांतले ग्रहांची स्थिति सांगण्याचे आरंभस्थान शके ४४४ च्या सुमारास संपांतांत होते. व रेवती नक्षत्रांपैकी २२ वी तारा (परिशिष्ट १ पहा.) त्या वेळी त्याच्या जवळ होती. ही तारा सांप्रत संपातापासून पूर्वेस १८१ अंशांवर आहे. ही तारा आरंभस्थानी कै० वा० केरोपंतांनी मानिली आहे. आमच्या ज्योतिषग्रंथांत संपातगति सुमारे ६० विकला मानिली आहे, यामुळे त्यांतलें आरंभस्थान वर्षास संपातापासून इतके पुढे जाते. सांप्रत ते सुमारे २२ अंश पुढे आहे. सायन पंचांगांत संपात हे आरंभस्थान मानितात. संपाती कोणताही ग्रह आला म्हणजे तेव्हां तो सायन मानाने अश्विनी नक्षत्री आला. त्याच्या पुढे ११ अंशांवर म्हणजे रेवती तारेशी येईल, तेव्हां केरोपंती (पटवर्धनी) पंचांगाप्रमाणे त्याचे रेवती नक्षत्र संपून तो अश्विनी नक्षत्री आला. आणि त्यापुढे ४ अंशांवर जाईल तेव्हां आपल्या देशांत हल्ली चालणाऱ्या ग्रहलाघवादि ग्रंथांवरून केलेल्या पंचांगांप्रमाणे अश्विनी नक्षत्री आला असे मानितात. सायन पंचांगांत ग्रहांचे स्थान मोजतांना अयनगति हिशेबांत घेतात म्हणून त्यास सायन (अयनयुक्त) गणनेचे पंचाग म्हणतात. केरोपंती किंवा ग्रहलाघवी यांत ती घेत नाहीत, म्हणून ती निरयनगणनेची पंचांगें होत. संपात आणि निरयनपंचांगांचे आरंभस्थान ह्यांतील अंतराचे अंशांस अयनांश म्हणतात. अयनचलनाचा विचार करीत असतां सांप्रत प्रसिद्ध होणाऱ्या तीन प्रकारच्या पंचांगांचा विचार ओघाने आला. त्या तीन पंचांगांतला मुख्य भेद वर सांगितला. त्या भेदामुळे ग्रहलाघवी पंचांगांत एकादी सूर्यसंक्रांति ज्या दिवशी होईल त्याच्या अगोदर सुमारे ४ दिवस केरोपंतीत होते, आणि त्याच्या अगोदर १८ दिवस म्हणजे ग्रहलाघवीच्या अगोदर २२ दिवस सायनपंचांगांत होते. यामुळे तिन्ही पंचांगांतील महिन्यांची नांवें कधीकधी भिन्न असतात. व अधिकमास भिन्न होतो. संपातापासून सूर्य निघाल्यापासून पुन्हां तो तेथे येण्यास ३६५ दिवस १४ घटका ३२ पळें लागतात. इतक्या काळास सायन सौरवर्ष म्हणतात. केरोपंती पंचांगाचें वर्ष १-यावरून त्या ग्रंथाचा काल शकापूर्वी १४८८ वर्षे हा येतो. २--क्रांतिवृत्तावर विषुववत्त मागे सरकतें. सुमारे २६००० वर्षात त्याचा एक फेरा होतो. यामुळे इतक्या काळांत विषुववत्ताचा ध्रुव क्रांतिवृत्ताच्या ध्रुवाभोवती सुमारे २३॥ अंश त्रिज्येच्या वर्तुळांत प्रदक्षिणा करितो. व यामुळेच विषुववृत्ताच्या ध्रुवस्थानी सर्वकाळ एकच तारा नसते. ३-महलाघव ग्रंथ गणेश दैवज्ञानें शके १४४२ मध्ये रचिला.