पान:ज्योतिर्विलास.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

योदयापासूली, पुढे एकादशे तेव्हा तय हो तिला यहत्या ज्योतिर्विलास. सोमवारी द्वितीया लिहिली; मंगळवारी व बुधवारी तृतीया लिहावी लागेल. वाढलेली तिथि तीन वारांस स्पर्श करिते म्हणून तिला 'व्यहस्पृक्' म्हणतात. तिथीचे मान ६० घटिकांहून कमी असते तेव्हां क्षय होतो.. रविवारी सूर्योदयानंतर २ घटिकांनी दशमी संपली, पुढे एकादशीचे मान ५५ घटिका आहे असे समजा. अर्थात् सू. र्योदयापासून ६७ घटिका गेल्यावर एकादशी संपून द्वादशी लागली. तेव्हां सोमवारी सूर्योदयीं द्वादशी आली, म्हणून एकादशीचा क्षय झाला. एकादशी मुळीच नाही, असे नाही. ती सूर्योदयीं कोणत्याच दिवशी नाही म्हणून तिचा क्षय मानिला इतकेंच. अशा वेळी उपोषणास तर दोन एकादशा होतात. स्मार्त रविवारीच उपोषण करतील. परंतु वैष्णव सोमवारी करितील. त्यांचा असा नियम आहे की प्रातःकाळी थोडीशी दशमी असली, किंवा सूर्योदयापूर्वी ६ घटिकांत दशमी असली, तर त्या दिवशी उपोषण करावयाचे नाही. अशा एकादशीला ते 'दशमीविद्ध' म्हणतात, व तिच्या दुसऱ्या दिवशी उपोषण करितात. . . ३० तिथींत दोन पंध्रवडे होतात. ह्यांस पक्ष (पांख ) म्हणतात. ज्या पक्षांत आवशीस काळोख असतो, त्यास कृष्ण म्हणजे काळोखाचा पक्ष म्हणतात, आणि ज्यांत आवशीस चांदणें असतें तो शुक्लपक्ष. नर्मदेच्या उत्तरभागी पूर्णिमान्त मान चालते. त्या संबंधी कोणाची अशी समजूत असते की आमचा शुक्लपक्ष तो तिकडच्यांचा कृष्णपक्ष. परंतु शुक्ल, कृष्ण, ही नांवें अन्वर्थ आहेत. एके ठिकाणी जो शुक्लपक्ष तो पृथ्वीवर कोठेही गेले तरी शुक्लपक्षच असावयाचा. शुक्लपक्षांत सूर्यास्ताच्या वेळी व कृष्णपक्षांत सूर्योदयाच्या वेळी चंद्र आकाशांत कोठे आहे हे पाहून स्थूल मानाने तिथि कळेल. क्षितिजापासून खस्वस्तिकापर्यंत ९० अंश होतात. सूर्य मावळतांच चंद्र खस्वस्तिकी किंवा याम्योत्तरवृत्तावर कोठे तरी दिसला तर तो सूर्याच्या पुढे ९० अंश आहे, म्हणून १२ अंशांस १ प्रमाणे ७ तिथि होऊन अष्टमी सुरू आहे असे समजावे. खस्वस्तिकाच्या पूर्वेस अर्ध्या आकाशांत चंद्र आहे, तर तो सूर्यापासून (९०+२ = ) १३५ अंशांवर आहे; म्हणजे त्या वेळी द्वादशी तिथि आहे. कृष्णपक्षांत सूर्योदयीं चंद्र पश्चिमेस क्षितिजावर ४५ अंश आहे, तर तो सूर्याच्या पुढे अर्धे आकाश म्हणजे १८० अंश जाऊन आणखी ४५ अंश म्हणजे एकंदर २२५ अंश पुढे आहे. तेव्हां १८ तिथि होऊन कृष्णचतुर्थी सुरू आहे. दररोज चंद्र सुमारे दोन दोन घटिका मागाहून उगवतो. शुक्लपक्षांत तिथीच्या दुपटी इतक्या घटिका दिवसास चंद्र उगवतो. नवमीस १८ घटिका दिवसास उगवतो. कृष्णपक्षांत पूर्णिमेपासून गेलेल्या तिथींच्या दुपटी इतक्या घटिका रात्रीस चंद्र उगवतो. कृष्णचतुर्थीस ८ घटिका रात्रीस उगवतो. ही रीति सुमाराची आहे. ह्या रीतीने आलेल्या वेळेत एकादी घटिका मागेपुढे होईल. वार हे पंचांगाचे दुसरे अंग होय. आमच्या प्राचीन ज्योतिष्यांच्या मते सर्व ग्रह पृथ्वीसभोवती फिरतात, त्यांचा क्रम शेवटाकडून घेतला तर शनि, गुरु, मंगळ,