पान:ज्योतिर्विलास.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

AL LIBRAR९३ PENERAL पंचांग. पंचांग. सार्वजनिक वाचनालय खेड, (खु.) बलाने आकाशास्त्र, व्यवहार सण इष्ट आहे. होत. ज्या चहा अर्थ चतुरंगबलो राजा जगतीं वशमानयेत् ।/ अहं पंचांगबलवान् आकाशं वशमानये ॥ " हत्ती, घोडे, इत्यादि चतुरंगबलयुक्त राजा पृथ्वी जिंकितो. मी पंचांगबलाने आकाश वश करितों." धर्मशास्त्र, व्यवहार, किंवा जिज्ञासा ह्यांतून कशाच्याही दृष्टीने पाहिले तरी पंचांगाची काही माहिती असणे इष्ट आहे. म्हणून ती सांगतो. तिथि, वार, नक्षत्र, योग, करण ही पंचांगाची पांच अंगें होत. ज्या दिवशी चंद्रसूर्य एके ठिकाणी असतात ती अमावास्या. अमावास्या या शब्दांतच हा अर्थ आहे. अमा ह्या अव्ययाचा अर्थ 'एके ठिकाणी' असा आहे. आणि वस् म्हणजे राहणे. अमावास्येस चंद्र दिसत नाहीं; परंतु गणितावरून ज्या वेळी चंद्रसूर्यांचे पूर्वपश्चिम अंतर शन्य होते तेव्हां अमावास्या तिथि संपते, असे मानतात. मग त्या वेळी त्यांचे उत्तरदक्षिण अंतर शून्य असो किंवा नसो. तेही मुळीच नसले तर सूर्यग्रहण होते. सर्याहन चंद्राची गति फार जलद आहे. तो सूयोजवळ येऊन लागलाच पहें पस जाऊं लागला म्हणजे प्रतिपदेस आरंभ झाला. दोघेही चालत असतात. दोघांमध्ये १२ अंश अंतर पडले म्हणजे प्रतिपदा तिथि संपली. चंद्रसूर्यामध्ये १२ अंश अंतर पडण्यास जो काल लागतो त्यास तिथि म्हणतात. हे अंतर पडण्यास मध्यम मानाने सुमारे ५९ घटिका ३ पळे लागतात. याप्रमाणे एकदां चंद्रसूर्य एकत्र आल्यापासून पुन्हा येतपर्यंत ३० तिथि होतात. परंतु त्यांचे २९॥ दिवस होतात. ह्या कालास चांद्रमास म्हणतात असें मागे सांगितलेच आहे. १२ चां मामांचे ३५४ दिवस होतात; व त्या कालांत ३६० तिथि होतात. अर्थात् तिथींची क्षयवृद्धि होऊन एकंदरीत ६ दिवस कमी होतात. चंद्राची गति कधी शीघ्र ने कधी मंद असते. यामुळे एका तिथीस कधी ६६ घटिका लागतात, कधी लागतात. आमच्या जुन्या पंचांगांत तिथि ५४ घटिकांहून कधी कमी होत पंचांगांत तिथीची घटीपळे दिलेली असतात. प्रतिपदा रविवारी ५४ घ असेल तर त्याचा अर्थ असा की, रविवारी सूर्योदयापासून इतका काळ गला तव्हा प्रातपदा तिाथ सपला. म्हणजे त्या वेळी सर्ग गेला. तिथीचे मान कधी ६० घटिकांहून जास्त होते, यामुळे तिथीची वृद्धि होते. सोमवारी ५८ घटिका द्वितीया आहे अशी कल्पना करा. पुढे १२ अंश अंतर पडण्यास ६५ घटिका लागल्या; तर सोमवारी पहाटेस ५८ घटिकांपुढे राहिलेल्या २ घटिका, मंगळवार सर्व दिवसाच्या ६० घटिका, व बुधवारी सूर्योदयानंतर ३ घटिका, अशा एकंदर १५ घटिका जातील तेव्हां तृतीया संपेल. येथे तृतीयेची वृद्धि झाली. सूर्योदयीं जी तिथि वगैरे असेल ती पंचांगांत लिहितात. ह्या उदाहरणांत