पान:ज्योतिर्विलास.pdf/७४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८
ज्योतिर्विलास.


पृथ्वी भोवती फिरत असतो. आपल्या पायांपासून पृथ्वीच्या मध्यबिंदूपर्यंत अंतर सुमारे ४ हजार मैल आहे. म्हणजे भूगोलाची त्रिज्या इतकी आहे. हिच्या साठ पट चंद्र दूर आहे. असे आहे तरी त्याच्या इतके आपल्यास जवळ आकाशातले दुसरे कोणतेंच तेज नाही म्हटले तरी चालेल. वीज, मेघ इत्यादि चमत्कार पृथ्वीच्या वातावरणांत होतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वर सुमारे ८० मैल वायु आहे; ह्या वायूचे वेष्टन सर्व पृथ्वीला आहे; त्या वेष्टनाला वातावरण म्हणतात. वातावरणप्रदेशाला वेदांत अंतरिक्ष असे म्हटले आहे. मेघ, इंद्रधनुष्य असे इत्यादी चमत्कार ज्या प्रदेशात होतात त्यास अंतरिक्ष, आणि चंद्रसूर्यादि गोल ज्यांतून फिरतात त्यास द्यु, आकाश इत्यादि संज्ञा देणे हे सोईचे आहे. पृथ्वीपासून चंद्राचे जे अंतर त्या अंतरावर एकादा धूमकेतु किंवा उल्का मात्र येण्याचा संभव आहे. बाकी कोणताही ग्रह वगैरे ह्या अंतराच्या शंभर पटीच्या आंत कधीही येत नाहीं

ज्योतिर्विलास.pdf

चित्रांक ४-पृथ्वी आणि चंद यांचे सापेक्ष आकार.


 चंदाचा व्यास सुमारे २१६० मैल आहे. म्हणजे पृथ्वीच्या चौथ्या हिश्शाहून थोडा जास्त आहे. पृथ्वी आणि चंद्र यांचे सापेक्ष आकार अंक ४ च्या चित्रांत दाखविले आहेत. सापेक्ष म्हणजे परस्परांवर अवलंबुन असणारे. म्हणजे चंद्राचा आकार चित्रांत दाखविला आहे तेवढा काढिला तर पृथ्वीचा आकार चित्रांत दाखविला आहे तेवढा काढिला पाहिजे. चंद्राच्या जितके पट पृथ्वीचा आकार आहे, म्हणजे चंद्र आणि पृथ्वी ह्यांच्या आकारांचे जे गुणोत्तर आहे तितके चित्रांतील चंद्र आणि पृथ्वी यांच्या आकारांचे आहे. ह्या आकारास अनुगुण-आकार म्हटले तरी चालेल. अंक ३ च्या चित्रांत ग्रहांचे सापेक्ष गुण आकार दाखविले आहेत (पृ० १२), त्यांत पृथ्वीचा ठिपका केवढा


 १-वर्तुळाचा किंवा गोलाचा व्यास म्हणजे मध्यबिंदूतून जाऊन परिघास दोन्ही अंगांनी मिळणारी रेषा. २-दोन पदार्थात एक दुसऱ्याच्या किती पट आहे हे दाखवणाऱ्या संख्येस त्यांचे गुणोत्तर म्हणतात,