पान:ज्योतिर्विलास.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५
रजनीवल्लभ.


लहान मोठी कोर किंवा पूर्ण चंद्र एका बाजूकडून पहिल्या प्रतीच्या ताराचे पिधान करण्यास येतयेत येतो; अगदी जवळ आल्यावर त्याची पूर्वेकडील कडा तारेस अगदी लागल्यासारखी दिसते; लागलीच ती तारा चंद्रबिंबाच्या आड नाहीशी होते; घटका दोन घटिका तारा तशीच लोपलेली असते, आणि मग चंद्राच्या पश्चिमेकडील अंगाने बाहेर पडते. हा देखावा फार मनोहर दिसतो. रोज सरासरी पांच सहा तारांचे पिधान चंद्र करितो. परंतु त्यांतल्या तेजस्वी तारांचे मात्र पिधान नुसत्या डोळ्यांनी चांगले पहाण्यास सांपडते. मघा, ज्येष्ठा, चित्रा, रोहिणी ह्या पहिल्या प्रतिच्या तारा आहेत. त्यांतही क्रमाने त्या एकीहून एक जास्त तेजस्वी आहेत रोहीणी सर्वांत तेजस्वी आहे. यामुळे चंद्र सर्वाहून तिच्या फारच जवळ येईपर्यंत ती दिसत असते. अर्थातच तिचे पिधान सर्वांहून मनोहर दिसते. हीच गोष्ट चंद्राची रोहिणीवर अति प्रीति आहे या समजुतीचे कारण होय. सर्वांत रोहिणीवर त विशेष प्रीति आहे ही गोष्ट अति प्राचीनकाळी आमच्या लोकांस ठाऊक आहे. तैत्तिरीय वेदाच्या संहितेतअशी कथा आहे:-

 “ प्रजापतीला ३३ कन्या होत्या. त्या त्याने सोमराजास दिल्या. तो त्यांतील रोहिणीशी मात्र समागम करूं लागला. यामुळे इतरांस मत्सर उत्पन्न होजन प्रजापतीकडे गेल्या. सोम त्यांच्या मागून जाऊन त्यांस प्रजापतीपाशी परत मागू लागला. प्रजापतीने सांगितले, सर्वांशी सारखा वागेन अशी शपथ कर, म्हणजे तूला कन्या परत देतो. त्याने शपथ केली. प्रजापतीने कन्या परत केल्या. तो पुनः त्यांपैकी रोहिणीजवळ मात्र जाऊ लागला. त्यामुळे त्यास यक्ष्मा झाला. त्यास यक्ष्मा झाला म्हणून त्यास राजयक्ष्मा म्हणतात. याप्रमाणे राजयक्ष्म उत्पत्ति झाली... नंतर तो सोम त्या तारांच्या पायां पडत त्यांच्या मागें जाउ लागला. त्या बोलल्या, तूं आह्मां सर्वांशी सारखे वागावे असा आह्मी वर मागतो. मग त्यांनी आदित्यास चरु दिला, आणि त्याच्या योगानें सोमास पापमुक्त केलें...."

 चंद्राच्या योगाने काही तारांचे पिधान कां होते हे आपण पाहू. चंद्र पृथ्वी भोवती फिरतो. म्हणजे तो पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वी भोवती क्रांतिवृत्तातून फिरत नाही. त्याची कक्षा क्रांतिवृत्तास छेदिते. त्या दोहोंच्या मध्ये सवापांच अंशांचा कोन आहे. यामुळे चंद्रकक्षेचा अर्धा भाग क्रांतिवृत्ताच्या उत्तरेस सुमारे सवापांच अंशांपर्यंत व अर्धा भाग दक्षिणेस सवापांच अंशापर्यंत आहे. म्हणून चंद्र नेहमी क्रांतिवृत्ताच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस अंशतः आला. खस्थ पदार्थांपासून क्रांतिवृत्तापर्यंत जे अंतर त्यास शर म्हणतात.हे अंतर खस्थापासून क्रांतिवृत्तावर लंब काढून त्याने मोजितात. चंद्राचा शर सवापाच अंशापर्यंत असतो. क्रांतिवृत्त आणि चंद्रकक्षा ह्यांच्या दोन पातबिंदूस अनुक्रमे राहु आणि केतु म्हणतात. राहूमध्ये किंवा केतूमध्ये चंद्र असतो तेंव्हा

-----

 १,-तै० सं० २.३.५. २-कृत्तिका नक्षत्राच्या ७ तारा आणि बाकी २६ मिळून ३३