पान:ज्योतिर्विलास.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
५१
आकाशस्थ ज्योतींविषयीं लोक काय म्हणत आले?.


" विश्वांतील जडद्रव्याचा प्रत्येक परमाणु दुसऱ्या परमाणूस आकर्षितो. ते कषेण प्रकृत्यशांशी सम प्रमाणांत आणि अंतराच्या वर्गाशी व्यस्त प्रमाणांत अ 1." हा नियम त्याने शोधून काढिला. या नियमाने विश्व बद्ध झाले आहे. हमाला याच नियमामुळे सूर्याभोवती फिरत आहे. सर्व ग्रह परस्परांस आक तात, यामुळे त्यांच्या गतीत थोडाबहुत फरक पडतो. केप्लरचे नियम या नियएच परिणाम आहेत असें न्यूटनने सिद्ध केले. याचा प्रिन्सिपिया नांवाचा ग्रंथ । सन १९८७ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांतील विषय आणि आकर्षणाच्या नि- नांचे सविस्तर विवेचन येथे सांगण्याचे प्रयोजन नाही. आकर्षणाचा नियम वि- स लागू आहे असे प्रथम त्याच्या मनांत आल्यावर तो नियम चंद्रगतीवर कसा होतो हे त्याने पाहिले. व ती गति या नियमाप्रमाणे होते असें दिसन आ- करून त्याची सत्यता स्थापित झाली. पृथ्वीचा व्यास त्या वेळी बरोबर माही- -हता. यामुळे प्रथम तो नियम बरोबर लागू पडेना. पुढे २० वर्षे ती गोष्ट २ पडली होती. पृथ्वीचे मान बरोबर काढण्याचा फ्रान्स देशांत फार प्रयत्न तिं एका विद्वानाने ते बरोबर ठरविले. त्यावरून न्यूटनने पुन्हा गणित क नाकर्षणाचा नियम स्थापित केला. पुढे अनेक विद्वान् झाले, व ग्रहगतीचे कळ झाले. आणि त्यांवरून न्यूटनचा नियम सर्व ग्रहगतीस लाग होतो. खि होत चाललें. युरेनसच्या गतीचे गणित त्या वेळी माहीत असलेल्या एकर्षण हिशोबांत घेऊन करावें तें वेधास बरोबर मिळेना. तेव्हां जितका डे त्यावरून गणित करून युरेनस यास आकर्षण करणारा ग्रह अमक अं. आहे, आणि तो अमुक दिवशी अमुक ठिकाणी सांपडेल असें अगोदर दो निष्यांनी ठरविले. व त्याप्रमाणे दुर्बीण लावून पहातां इ० सन १८४६ मध्ये यांनी कधीही न दिसणारा असा नेपचुन् हा ग्रह सांपडला. ह्या आश्च- + गोष्टीवरून आकर्षणनियमाची सत्यता, आणि हल्लीच्या ज्योतिषशास्त्राची वस्था ही दिसून येतात.

 ज्योतिषशास्त्राचा आणि त्याशी ज्यांचा संबंध आहे अशा दुसऱ्या शास्त्रांचा करणारे इतके विद्वान् कोपर्निकसाच्या वेळेपासून आजपर्यंत युरोप व अमेरिका डात झाले की त्यांची नांवे व कृति एकेका वाक्यांत सांगितली तरी ह्या पर २५ पृष्ठे भरतील. या मालिकेत गोंवावयास आमच्या देशांतले एक- दिसते. ते अठराव्या शतकांतल्या जयसिंहाचे होय. कोपर्निकसापर्वी आ देशांतील व युरोपांतील ज्योतिष सारख्याच स्थितीत होते म्हटले तरी चालेल त्या दोहोंमध्ये मोठा भेद हा होता की, आमचे युरोपच्या प्रमाणे वर्धमान नव्हते. कोपर्निकसाच्या पूर्वी नुकतेच आमच्या देशांतले शोधक ज्योतिषी दैवज्ञ आणि त्याचा पिता केशव दैवज्ञ हे झाले. कोपर्निकसापासन, या ज्योतिषशास्त्राचे इतकें स्थित्यंतर झाले की पूर्वीचे आणि नंतरचे ह्यांग वटवृक्षाचा नुकताच उगवलेला रोपा आणि अनेक शतके वाढून आपल्या