पान:ज्योतिर्विलास.pdf/६४

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४८
ज्योतिर्विलास.


जेस्ट ग्रंथाचेही भाषांतर आरबीमध्ये झाले. मुसलमान लोक वेधाच्या कामी कुशल होते. त्यांनी वेधाच्या यंत्रांत पुष्कळ सुधारणा केली. त्यांची वैधयंत्र चांगली होती.सूक्ष्मवेधांनी त्यांनी ग्रहस्थिति काढण्याचे गणित सुधारले. म्हणजे आमच्या हल्लीच्या भाषेप्रमाणे ज्योतिषास चालन दिले. तैमुरलंग ह्याचा हिदुस्थानाशी कोणत्या प्रकारचा संबंध आहे हे प्रसिद्धच आहे. त्याचे नांव ऐकताच त्याची क्रूरकर्मे डोळ्यांपुढे येऊन अंगास शहारे येतात. परंतु काय योग पहा ! त्याचा नातू उलुगबेग याचे नांव संस्कृत ग्रंथांत मानार्ह झाले आहे. उलुगबेग याने समरकंद येथे वेधशाळा स्थापून उत्कृष्ट वेध केले. त्यांचा उल्लेख व उपयोग हिदुस्थानात वेधशाळा स्थापून ज्योतिःशास्त्रास चालन देणारा जयसिंह ह्याने आपल्या सिद्धातसम्राट ग्रंथांत केला आहे. टालमीच्या नक्षत्रस्थितिपत्रकास अंतर पडले आहे असे पाहून उलगबेग याने स्वतः वेध घेऊन नवीन तारास्थितिपत्रक केले. त्यात इ० सन १४३७ या कालची १०१९ तारांची स्थिति आहे.

 आरब लोकांच्या द्वारे ज्योतिषशास्त्राचे ज्ञान युरोपखंडांत पसरले. इ.स च्या नवव्या व दहाव्या शतकांत फ्रान्स वगैरे देशांतील लोक स्पेन देशात मुसलमानांपाशी शास्त्राध्ययन करूं लागले. इ. सनाच्या १३ व्या शतकात अलमाजेस्टच्या आरबी रूपांतरावरून त्याचे लाटिन भाषांतर झाले. व कास्टिलचा राजा आलफान्सो याने १३ व्या शतकांत ज्योतिषाचा नवीन ग्रंथ करविला. तेणें करून ज्योतिषाच्या अभ्यासास चांगले उत्तेजन आले. १५ व्या शतकांत दोन चांगले जर्मन ज्योतिषी, व वेध करणारे झाले. पुढे कोपर्निकस जन्मला.

 एकाएकी एकादा अलौकिक पुरुष उत्पन्न होऊन कोणतेही शास्त्र एक पूर्णावस्थेस आणतो असे मुळीच नाही. सर्व शास्त्रांस सांप्रतची रूपें येण्यास अनेक व्यक्तींचे दीर्घकाळचे प्रयत्न कारणीभूत झाले आहेत. त्यांत ज्योतिषास ही गोष्ट विशेषेकरून लागू आहे. या शास्त्रांत प्रत्येक शोधकास तत्पूर्वशोधकांचे प्रयत्न उपयोगी पडत आले आहेत. कोपर्निकस, न्यूटन, ह्यांसारखे अलौकिक पुरुष थोडेच उत्पन्न होतात खरे, तरी त्यांच्या वेळची परिस्थिति त्यांस अनुकूल साह्यभूत होते, तेव्हां त्यांच्या हातून नवीन महासिद्धांतांचा शोध लागतो. कोपर्निकसापूर्वी पांचसहा शतकें युरोपखंडांत ज्योतिषशास्त्राचा अभ्यास सुरू होऊन वाढत्या स्थितीमध्ये होता.

 ग्रहस्थितीच्या खऱ्या तत्त्वाचे ज्ञान प्रथम जगास करून देण्याचा मान कोपर्निकस ह्यास आहे. तो इ० स० १४७३ मध्ये प्रशिया देशांत जन्मला. विश्वरचनेचे खरे स्वरूप प्रथम इ० स० १५०७ मध्ये त्याच्या मनांत आले. परंतु ते लोकांस नुसते सांगून कीर्ति मिळविण्याची घाई त्याने केली नाही. दीर्धकाल शोध, वेध, व गणित करून त्याच्या मताची सत्यता त्यास पक्की दिसून आल्या इ० स०१९४३ मध्ये त्याने आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्या छापी पुस्तकाची