पान:ज्योतिर्विलास.pdf/५९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


आकाशस्थ ज्योतींविषयी लोक काय म्हणत आले ?  ४३

कांचे लक्ष प्राचीन काळी ग्रहणे इत्यादि चमत्कार पहाण्याकडे फार होते. हे लोक पुष्कळ शतकें ग्रहणांचे वेध घेत आले. त्यांत इसवी सनापूर्वी ७१९ आणि ७२० या वर्षी झालेल्या ३ ग्रहणांचे काल त्यांनी दिले आहेत. त्यापूर्वी व नंतर बराच काल ते वेध घेत असत असे दिसते. या लोकांचे ज्योतिषशास्त्रसंबंधे लेख, किंबहुना त्यांच्या ज्योतिषांची नांवेंही आतां उपलब्ध नाहीत. यामुळे ग्रहगतीच्या नियमांचे ज्ञान त्यांस कितपत होते, हे समजण्याचे साधन काही नाही. त्यांच्या ज्ञानाचा इतिहास कायतो ग्रीक लोकांच्या ज्योतिषग्रंथांवरून कळतो. २२३ चांद्रमासांत म्हणजे सुमारे १८ वर्षांत चंद्रसूर्याची ग्रहणे एकदां ज्या कालांतराने झाली, याच अंतराने त्यांची पुनरावृत्ति होते, असा शोध त्यांनी लाविला होता. त्यांमध्ये चांद्रमानाचे प्राधान्य होते, असे दिसते. “ त्यांनी शंकुयंत्राने सौरवर्षाचेही मान बरेच जवळ जवळ काढिले होते. तथापि जीवरून ग्रहगतीचे नियम बसवितां येतील अशी सामग्री त्यांनी वेधांनी तयार करून ठेविली असे दिसत नाही. त्यांनी ग्रहणे इत्यादि चमत्कार अमुक काळी झाले एवढे मात्र लिहून ठेविले, आणि त्यावरून अगदी थोडे स्थूल सामान्य नियम त्यांनी काढिले. त्यांच्या ग्रहणांवरून पुढे कांहीं ग्रीक गणितज्ञांनी चंद्रगतीचे मापन बरेच सक्ष्म केले." असे काही लोकांचे मत आहे. “ग्रीक लोकांचे ज्योतिषसिद्धांताचे ज्ञान आणि वेधपद्धति ह्यांचे मूळ खाल्डीयाच्या मैदानांत असू शकेल " असेंही काही लोकांचे म्हणणे आहे. तथापि खाल्डीयन लोक ज्योतिषशास्त्राचे मूळ उत्पादक असे सर्व युरोपियन ज्योतिषी मानितात. इसवी सनापूर्वी सहाव्या शतकांत बाबिलोनियन लोकांच्या राज्याचा लय झाला तेव्हां त्यांच्या ज्योतिषज्ञानाची गति कुंठित झाली असे दिसते.

 इजिप्त देशांत पिरमिड म्हणून इमारती बांधलेल्या आहेत. त्यांत एक मोठा पिरामिड ३० व्या अक्षवृत्तावर बांधिलेला आहे. एकाद्या किल्ल्याच्या भिंतीस तोफा मारण्याकरितां भोंके ठेविलेली असतात, त्याप्रमाणे त्या इमारतीच्या उत्तरेच्या भिंतीत एक तिरपे छिद्र आहे. ते इमारतीच्या पायाखाली मध्यबिंदूपर्यंत गेलेले आहे. क्षितीजाशी त्याचा २६ अंश १७ कला इतका कोन झाला आहे. हे छिद्र ध्रुवताऱ्याचा वेध घेण्याकरितां ठेविले असावे, असे अनुमान आहे. अयनचलनामुळे* ध्रुवतारा सर्वकाल एकच नसते, कालांतराने बदलते. त्याप्रमाणे या छिद्रांतून ध्रुवतारेचा वेध येण्याजोगी स्थिति त्या स्थली केव्हां होती याविषयीं गणित केले असतां जें की, इसवी सनापूर्वी २१६० च्या सुमारास कालिय (ड्राको ) या तारकापुंजातील पहिली तारा ध्रुवबिंदूजवळ क्षितिजापासून इतक्या उंचीवर होती व त्यावर त्या काली ही इमारत बांधिली असावी, आणि त्यावरून व इतर काही प्रमाणांवरून ईजिप्तचे लोक ज्योतिषशास्त्रांत चांगले प्रवीण असावे, असें अनुमान करितात. त्या संबंधी दंतकथाही पुष्कळ आहेत. तथापि इजिप्तच्या लोकांचेही ज्योतिषशास्त्र विषयक लेख मुळीच नाहीत. क्रांतिवृत्तांतील मेष इत्यादि बारा राशीची नांवे इ.


 * अशा प्रकारचे पारिभाषिक शब्द वगैरे ह्या प्रकरणांत आहेत, त्यांचे विवेचन पुढे येत