पान:ज्योतिर्विलास.pdf/५३

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
३७
देवांचीं मंदिरें.

चकचकीत आहेत. चकचकीत दोहोंपैकी एक चित्रातारेच्या समोरच खाली दिसते; दुसरी तिच्या डाव्या अंगास किंचित् खाली आहे. दोन्ही सारख्याच तेजस्वी आहेत. चित्रांहून त्यांचे तेज पुष्कळ कमी आहे. चित्रातारेपासून पहिली जितक्या अंतरावर आहे, त्याहून पहिली आणि दुसरी यांचे अंतर पुष्कळ कमी आहे. फेब्रुआरीमध्ये पहाटेस सुमारे पांच वाजतां ह्या दोन्ही मध्यान्हीं येतात; त्यांत पहिलीच्या मागाहून २६ मिनिटांनी दुसरी येते. पहिली खस्वस्तिकाच्या दक्षिणेस सुमारें १५ अंश असते, व दुसरी सुमारे २९ अंश असते. पूर्वेस पाहिल्या तर मोठ्या दोन आणि बारीक दोन ह्यांचा एक समांतरद्विभुजचौकोन (त्रापिझाइड) होतो. त्यांत वरच्या दोहोंस सांधणारी रेषा जास्त लांब आहे. पूर्णिमेचा चंद्र जवळ असतां बारक्या दोन मुळीच दिसत नाहीत; इतकेच नाही, तर मोठ्या दोनही अगदी अस्पष्ट दिसतात. परंतु कधी कधी चंद्राची कोर मोठ्या दोन तारांच्या मध्ये येते तेव्हां त्या तिहींची शोभा फार मनोहर दिसते. ती पाहून-

यदि विशाखे शशांकलेखामनुवर्तेते
-विशाखांच्या दोन तारा चंद्ररेखेस अनुसरल्या....-

शाकुंतल, अंक ३. 

कालिदासोक्तीचे स्मरण होते. आणि कालिदासाने प्रत्यक्ष पाहून हे वर्णन केले आहे, असे दिसून येऊन व त्याची शोधकता आणि मार्मिकपणा मनांत येऊन त्याविषयी पूज्यबुद्धि जास्तच वाढते. दोन विशाखांची उपमा भारतादिकांतही पुष्कळ आढळते.
 विशाखांच्या खाली पूर्वेस अनुराधा पहाव्या. त्यांच्या कोणी तीन व कोणी चार तारा मानितात. चारही बहुधा एका सरळरेषेत आहेत. त्यांत दक्षिणेकडील शेवटची बारीक आहे. ही सरळ रेषा आणि विशाखांच्या दोन मोठ्यास साधंणारी सरळ रेषा यांमध्ये डावेकडे म्हणजे उत्तरेस जितकें अंतर आहे त्यापेक्षा दक्षिणेस जास्त आहे.
 - अनुराधांच्या सरळ रेषेवर मधोमध पूर्वेस लंब काढिला असतां त्या सुमारास ज्येष्ठाच्या तीन तारा आहेत. तिहींमध्ये मधली तारा पहिल्या प्रतीची आहे.
 ज्येष्ठांच्या पूर्वेस मूळ आहेत. त्यांचे वर्णन मागे आलेच आहे. सिंहपुच्छत ज्येष्ठांच्या तारा धरल्या तर ते फारच भव्य दिसते.
 विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा व मूळ ही नक्षत्र मे महिन्यांत दहा वाजतां किंवा फेबुआरीत पहाटेस पांच वाजतां पूर्वेस, किंवा दुसऱ्या नक्षत्रपटांत दाखविल्या वेळी पश्चिमेस पहाणे सोईचे आहे.
 तैत्तिरीय ब्रामणांत* नक्षत्रिय प्रजापति म्हणून एक विशाल आकृति वर्णिली माहे. “हस्त नक्षत्र हा त्याचा हात, चित्रा हें शिर, स्वाती हे हृदय, विशाखाच्या दोन तारा ह्या मांड्या, आणि अनुराधा ही उभे राहण्याची जागा."


 * १.५.२. *१.५.३