पान:ज्योतिर्विलास.pdf/४९

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३३
देवांची मंदिरे.


नक्षत्रनाम   तारासंख्या   नांव    संख्या
पूर्वाफल्गुनी श्रवण
उत्तराफल्गुनी पूर्वाभाद्रपदा
हस्त उत्तराभाद्रपदा

 याप्रमाणे तारा नक्षत्रपटांत दिल्या आहेत.

 मूळांच्या तारा कांहीं ग्रंथांत ११ आहेत, काहींत ९ आहेत. एका ग्रंथांत ६ च आहेत. ९ चांगल्या स्पष्ट दिसतात.

 आतां बाकी नक्षत्रे अनुक्रमें पाहूं. पहिल्या नक्षत्रपटांत अश्विनीपासून स्वातीपर्यंत नक्षत्रे आली आहेत. दुसऱ्यांत स्वातीपासून अश्विनीपर्यंत आहेत. तिसऱ्यात धनिष्ठांपासून पुनर्वसूपर्यंत नक्षत्रे पुनः आली आहेत. याशिवाय उत्तरेच्या व दक्षिणेच्या आणखी कांहीं तारा तिन्ही पटांत आहेत.*

 अश्विनीच्या तारा कोणी दोन व कोणी तीन मानितात. तिहींत दोन जरा जवळ आहेत, त्यांत उत्तरेची तेजस्वी आहे. तिसरी पूर्वेस आहे, ती सर्वांत तेजस्वी आहे. आश्विनांत आवशीस ह्या पूर्वबिंदूच्या किंचित् उत्तरेस उगवतात; ६॥ तासांनी मध्यान्हीं येतात; व ६॥ तासांनी पश्चिमबिंदूच्या थोड्याशा उत्तरेस मावळतात. जानुआरीच्या आरंभी त्या आवशीस मध्यान्हीं येतात; व तेव्हां खस्वस्तिकाच्या किंचित् उत्तरेस दिसतात. तीन तारा मानिल्या तर त्यांची आकृति घोड्याच्या तोंडासारखी दिसते.

 अश्विनीरूप धारण करणाऱ्या संज्ञा नामक सूर्यपत्नीचे ठायीं अश्वरूपधारी सुर्यापासून दोघे अश्विनीकुमार झाले, अशी कथा आहे. तिचा संबंध अश्विनी नक्षत्राशी दिसतो. वेदादिकांतील अश्विनौ ( दोन अश्विन ) म्हणून ज्या प्रसिद्ध देवता मूळच्या तारारूप होत; बहुधा शुक्र आणि गुरु ह्यांस अश्विन हे नांव प्रथम असावें अशी माझी समजूत आहे.

 भरणीच्या तिन्ही तारा बारीक आहेत; त्यांचा लहानसा त्रिकोण बनतो. आश्विनी आणि कृत्तिका ह्यांस सांधणारी रेषा काढिली तर तिच्या उत्तरेस तो त्रिकोण आहे.

 आर्द्रा नक्षत्राची मी लिहिलेली तारा मार्चमध्ये आवशीस मध्यान्हीं येते, व त्या वेळेस ती खस्वस्तिकाच्या किंचित् दक्षिणेस दिसते.

 आमच्या ग्रंथांत लिहिलेल्या नक्षत्रांच्या योगतारा व इतर तारा आकाशांत कोणत्या, याबद्दल निर्णय करण्याकरितां ४।५ युरोपियन विद्वानांनी प्रयत्न केला आहे. व बहुधा तदनुसार योगतारांविषयी आमच्या ५/६ विद्वानांनी व इतर तारांविषयी दोघांनी प्रयत्न केले आहेत. त्यांत आर्द्रा तारा कोणती याविषयी शंका आहे. मृगांतली तेरावी म्हणजे मृगाचा पुढचा डावा पाय ही आर्द्रा कोल-


 * या पुढे हे प्रकरण सगळेच प्रथम न वाचतां जेव्हां नक्षत्रांची ओळख करून घ्यावयाची वाचलें तरी चालेल.