पान:ज्योतिर्विलास.pdf/४८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३२   ज्योतिर्विलास.

सूनच ती बारीक आहे, कोणास दिसते, कोणास न दिसते, म्हणून काही कथांत आल्या व कांहीत सहा आल्या, न कळे.

 कार्तिकस्वामीची कथा प्रसिद्ध आहे. सहा कृत्तिका ह्या त्याच्या माता होत. व त्यावरून त्यास 'षाण्मातुर' असे म्हणतात. सहांपासून त्यास सहा मुखे झाली म्हणून त्यास 'षडानन' हे नाव पडलें.

 'मृगांच्या सुमारास आकाशाच्या उत्तरभागी ब्रह्महृदय, अग्नि आणि प्रजापति ह्या तीन तारा प्राचीन ग्रंथांत वर्णिल्या आहेत. ह्यांतील पहिली पहिल्या प्रतीची आहे. ती फेब्रुआरीअखेर आवशीस मध्यान्हीं येते व तेव्हां खस्वस्तिकाच्या उत्तरेस सुमारे २५ अंश असते. तिच्या दक्षिणेस १७ अंश, म्हणजे खस्वस्तिकाच्या उत्तरेस सुमारे ८।९ अंश अग्नि आहे. तो दुसऱ्या प्रतीचा आहे ब्रह्महृदयाच्या ईशान्येस प्रजापति आहे. ही तारा बारीकच आहे.

 'आकृतीवरून कांहीं नक्षत्रांची ओळख सहज होईल. हस्त या नांवावरूनच त्याची आकृति समजते. हाताच्या पांच बोटांस चुना वगैरे लावून ती भिंती वर उठविली असतां जशी दिसतात, त्याप्रमाणे हस्त नक्षत्राची आकृति आहे (नक्षत्रपट १ पहा) मार्च व अप्रिल महिन्यांत हे आवशीस उगवते. जूनमधे आवशीस मध्यान्हीं येते. तेव्हां तें खस्वस्तिकाच्या दक्षिणेस सुमारे ३५।४० अंश दिसते. हस्तयुक्त चंद्राची उपमा पुष्कळ ठिकाणी येते. 'पांच पांडवांनी युक्त असा द्रोण, हस्ताच्या पांच तारांनी युक्त अशा चंद्रासारखा शोभला.' असें वर्णन महाभारतांत आदिपर्वात आहे.

 मूळाची आकृति सिंह-पुच्छासारखी किंवा विंचवासारखी आहे. ( नक्षत्रपट २ पहा) विंचवाच्या आकृतीवरून वृश्चिक हे एका राशीचें नांव पडले आहे वृश्चिक म्हणजे विंचू. राशि शब्दाचा एक अर्थ तारकापुंज असा आहे.

 मूळ नक्षत्र जुनच्या उत्तरार्धात आवशीस उदय पावतें. सप्तंबरच्या आरंभी आवशीस व अप्रिलमध्ये पहाटेस मध्यान्हीं येते. ते सुमारे ५०|६० अंश दक्षिणेस दिसते.

 कोणत्या नक्षत्राच्या किती तारा ह्याविषयी ज्योतिषग्रंथकारांचा मतभेद आहे ज्या नक्षत्रांविषयी बहुतेक ग्रंथांची एकवाक्यता आहे, त्यांची यादी खाली दिली आहे


 १ --अध्याय १३५. २-जें नक्षत्र अमुक महिन्यांत आवशीस उदय पावतें असें आहे, ते पूर्वीच्या महिन्यांत सुमारे ९ वाजतां उदय पावेल. पुढील महिन्यांत सायंकाळी 7 वाजतां उदय पावेल. म्हणजे आवशीस बरेंच वर आलें दिसेल.

नक्षत्रनाम   तारासंख्या   नांव    संख्या
भरणी चित्रा
रोहिणी स्वाती
मृगशीर्ष ज्येष्ठा
आर्द्रा अभिजित्