पान:ज्योतिर्विलास.pdf/४६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३०    ज्योतिर्विलास.

की ही माझी. ती पूर्वदिशेस गेली. तिकडे प्रजापति गेला. याप्रमाणे ती संरक्षणाकरितां पुष्कळ ठिकाणी फिरली. शेवटी आकाशांत गेली. आणि रोहिणी झाली. आकाशांत आरोहण केले म्हणून रोहिणीला रोहिणीत्व आले."

 तैत्तिरीय ब्राह्मणांत दुसरे एके स्थली रोहिणी शब्दाची व्युत्पत्ति दुसऱ्या एका प्रकाराने सांगितली आहे. सारांश मृग, व्याध, रोहिणी यांची आकृति इत्यादिकांवरून ह्या कथा कल्पिलेल्या दिसतात.

 वरील कथांत रोहिणी नक्षत्र आले आहे, ते मृगाच्या पश्चिमेस जवळच आहे.

 मृगाच्या पाठीस रुद्र लागला असे उल्लेख पुराणादिकांत पुष्कळ येतात.
  मृगानुसारिणं साक्षात्पश्यामीव पिनाकिनं ॥
  (छव दिखती ये हरन पिछे जौं शिवजी जंगल भटके )
     शाकुंतल, अंक १.

 ही कालिदासोक्ति पुष्कळांस माहीत आहेच. महाभारतांत असे उल्लेख पुष्कळ आहेत. परंतु त्यांत एके ठिकाणी थोडे निराळे वर्णन आहे तें असें:- "देव यज्ञ करीत असतां तेथें रुद्र आला. त्याने यज्ञाच्या हृदयांत बाण मारिला तेव्हां मृगाचे रूप धारण करून तो 'पावक' यज्ञ आकाशांत गेला. तेथे त्याच्या मागें रुद्र लागला आहे असा तो शोभू लागला."

 प्रोफेसर टिळक यांनी एको डेक्कनकॉलेजग्यादरिंगच्या वेळी प्रजापति आणि त्याचे यज्ञोपवीत सांगितले, त्यांत मृग हा प्रजापति आणि बाणाच्या तीन तारे हे त्याचे यज्ञोपवीत होय. प्राचीन पारसिकांच्या ग्रंथांतही मृग आणि त्याच्या पोटांतील तीन तारा ह्यांस होम (सोम) नामक देव आणि त्याची कस्ती हे रूप आले आहे. खाल्डियन, ग्रीक वगैरे प्राचीन राष्ट्रांच्याही मृगासंबंधी दंतकथा आहेत. ग्रीक लोकांनी मृग ह्या तारकापुंजास ' ओरायन ' हे नांव दिले होते ते अद्यापि पाश्चात्य ज्योतिषांत चालू आहे. आमच्या देशांत मृगास ' अग्रहायन' असें एक प्राचीन नांव आहे. त्याचाच अपभ्रंश ओरायन हा दिसतो.

 रोहिणीची आकृति समद्विभुजत्रिकोणाचे समभुज वाढविल्यासारखी दिसते. त्रिकोणाचा शिरःकोण पश्चिमेकडे आहे. आणि सर्वांत चकचकीत तारा दक्षिणेकडील बाजूच्या टोकात आहे. ही पहिल्या प्रतीची आहे. हिला रोहिणी नक्षत्रांतली मुख्य तारा किवा योगतारा म्हणतात. नक्षत्रांच्या तारांपैकी जी सर्वांत चकचकीत असेल तिला बहुधा योगतारा म्हणतात. योग म्हणजे समागम किंव युति. नक्षत्रतारांचा समागम चंद्रादिकांशी होतो. त्यांत मुख्यतः चंद्राशी पुष्कळ वेळां होतो. मार्गशीर्षांत रोहिणी नक्षत्र आवशीस उगवते. फेब्रुआरीत आ


 १-सौप्तिक पर्व, अ० १८: २-मे १८९२.