पान:ज्योतिर्विलास.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२    ज्योतिर्विलास.

विस्तार एक इंच होता. तरी त्याच्या मंडलाची रुंदी सुमारे २०० फूट होती. ती पाहून चमत्कार वाटे.

 आतां मध्यवर्ती तेजोगोलापासून मी सुमारे ७ मैल लांब आलो होतो. फार अंतरामुळे तो गोल बारीक दिसत होता. त्यापासून सुमारे १४ मैलांवर आणखा एक गोल दिसू लागला. मी तेथपर्यंत गेलो नाहीं तरी दिव्यदृष्टीने मला दिसलें की तो सुमारे १६ इंच व्यासाचा आहे, व त्याला चार परिचारक आहेत. त्याच्याही पलीकडे एकंदर २२ मैल अंतरावर आणखी एक गोल दिसला. तो मागच्याहून किंचित् मोठा होता, व इतक्या अंतरावरूनही तो मधल्या तेजोगोलास प्रदक्षिणा करितो आहेसे दिसले. त्याचा तो मार्ग किती अवाढव्य ! माझ्या जन्मांत त्याची अर्धी तरी प्रदक्षिणा पुरी होईल की नाही याचा मला संशयच वाटला. याला एकच परिचारक मला दिसला.

चित्रांक ३–ग्रहांचे सापेक्ष आकार.

 मी आतां इतका लांब आलो होतो की, मला दिव्यदृष्टि आलेली होती. म्हणून मात्र तो पहिला छोटेखानी गोल मला दिसत होता. त्याची काय अहवाल