पान:ज्योतिर्विलास.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

१० ज्योतिर्विलास.

आपल्या स्थानापासून मी पुन्हा मागे पाहूं लागलों, तो त्या अंधकारमय प्रदेशांत तेजाचे दोन लहान लहान ठिपके मला दिसत होते. एक मी पाहिलेला चिमुकल्या बुद्धिमान् प्राण्यांचा लहान गोल व दुसरा त्याभोवती फिरणारा त्याचा परिचारक. बारीक नजरेने पहातां मध्ये माझ्या जवळच दुसरा एक गोल दिसू लागला. त्यावर प्रखर प्रकाश होता. तो लहानच होता तरी त्या पहिल्या गोलाच्या परिचारकापेक्षा मोठा होता. त्याचा व्यास सुमारे १॥ इंच होता. तेजोगोलापासून तो सुमारे ५०० यार्डांवर होता, व त्या तेजोगोलाभोंवती फिरत होता. त्याची गति पहिल्या गोलाहून पुष्कळ जलद होती. तेथून पुढे दुसरा एक गोल दिसला. तो आपल्या सभोवती फिरतफिरत मध्यवर्ती तेजोगोलाप्तभोवती फिरत होता; व त्यापासून ह्याचे अंतर ९३० यार्ड होते. पहिल्या गोलाप्रमाणे तो सुमारे ४ इंच व्यासाचा होता. परंतु मला हल्ली त्याहून मोठा व त्याहून फार तेजस्वी दिसत होता. जवळ जाऊन पहातों तो ह्या दोन्ही गोलांचे तेज उसनेच दिसले. बुद्धिमान् प्राण्यांच्या गोलावरून ज्वलद्गोल जेवढा दिसे त्याच्या सातपट ह्या दोहोंतील पहिल्यावरून व दुप्पट दुसऱ्यावरून दिसे. पुढे ज्वलदोलापासून सुमारे १२०० आपल्यास गट्ट करावयास सांपडावा. कोरड्या भागावरही काही जंतु दिसले. ते कोठे पुष्कळ होते व कोठे थोडे होते. माझ्या बचकेंत राहील एवढ्या ह्या गोटीवरही असंख्यात जंतु होते हे पाहून मला आश्चर्य वाटले. वास्तविक त्यांस जंतु म्हणणे देखील शोभत नाही, इतके ते लहान होते.

 कोरड्या प्रदेशावरील जंतूंमध्ये काही प्राणी इतरांपेक्षां कांही विलक्षण दिसले. हे इतरांपेक्षा मोठे होते, किंवा ह्यांचे स्वरूप काही विलक्षण होते, असे नाही. इतर काहीपेक्षा हे लहानच होते. परंतु ह्यांस बुद्धि आहे असे दिसून आले. त्यांनी आपल्याकरितां छोटेखानी वसतिस्थाने बांधिली होती, व आपल्या जातीच्या प्राण्यांच्या सोईसाठी लहानमोठे रस्ते केले होते. त्या रस्त्यांवरून ते गाड्यांतून बसून जात. तसेच पाण्याच्या कवचांतूनही कसल्याशा पदार्थांत बसून ते तरून जाताना दिसले. कवचाला ती खोली कोठची? परंतु त्यांच्या त्या तरणपात्रास ती भारी होता. केव्हां केव्हा माझ्यासारखा कोणी त्यावर फुंकर घालीत आहेत की काय असे वाटे. परंतु तेवढ्याने त्या पाण्याचा कल्लोळ होऊन जाई, आणि त्यांत त्या प्राण्यांची तरणपात्रे पालथीं होऊन प्रळय उडे. तेव्हां शेकडों प्राणी पाण्यांत गडप होत. तथापि पुन्हा हजारों प्राणी त्या जलकवचांतून जात येत. त्या उदकांतून कोळ्या