पान:ज्योतिर्विलास.pdf/२५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत
स्वप्न-खरेंच.    

च्या धाग्याहूनही अतिसूक्ष्म अशा काही तारा त्यांनी टाकल्या होत्या. व कोरड्या प्रदेशावरही त्या नेल्या होत्या. त्यांच्या द्वारे ते एकमेकांस निरोप पाठवितात, असे मला माझ्या दिव्यचक्षूनी समजले.

 त्या धाकट्या गोलावर घडणाऱ्या किंवा मला समजलेल्या, सर्व गोष्टी सांगू लागलों तर जागा पुरणार नाही. त्यांत मला ज्या फारच आश्चर्यकारक वाटल्या त्यांतल्या काही सांगतो. आजपर्यंत मनुष्याने केलेल्या अतिप्रभावाच्या सूक्ष्मदर्शक यंत्रांतूनही दिसणार नाहीत इतके सूक्ष्म ते जीव होते, तरी खरोखर त्यांस त्यांच्या त्या छोट्या गोलाबाहेरच्याही अनेक गोष्टी माहीत होत्या. माझ्या बोटाने सहज त्यांतल्या शेकडों जीवांचा चुराडा व्हावा, इतके ते दुर्बळ असतां. तो मध्यवती तेजोगोल ते पहात, इतकेच नाही, तर तो किती दूर आहे, किती मोठा आहे, किती तेजस्वी आहे, किती उष्ण आहे, फार काय सांगावें, किती जड आहे, हेही त्यांनी काढिले होते. आपला लोक सोडून त्यांस दुसरीकडे जातां येत नव्हते. इतकेच नाही, तर त्यांस उभे राहण्यास जागाही स्थिर नव्हती. त्यांचा गोल फिरत असल्यामुळे त्यांस अर्धा काळ काळोखांत रहावे लागे. त्यांस हात होते की नाही कोण जाणे. असतील तर त्यांजपासून तो तेजोगोल त्यांच्या किती हातांवर होता, त्याची तर गणनाच करितां येणार नाही म्हटले तरी चालेल. परंतु इतक्या लांबच्या तेजोगोलाचे प्रकृतिधर्मही त्यांनी शोधून काढिले होते. त्यांस दिसून आले होतें की, तो गोल अतिजाज्वल्य तेजाचे केवळ घर आहे. त्यांतून तेजाचे फवारे कधीकधी चार फूटपर्यंत बाहेर येतात, आणि कधीकधी त्यांची उच्चशिखरें बनून राहतात. त्या गोलावर अत्युष्ण वाफांचे करवताच्या धारेसारखें वेष्टन सुमारे दोन इंच आहे परंतु एकंदरीत हा अंमळ काळसर होता. ह्याच्या स्वरूपांत दुसराच एक विलक्षण प्रकार होता. त्याच्या भोवती कांहीं वलये होती. ती त्या गोलास कोठेही लागलेली दिसत नव्हती, तरी त्याच्या अर्ध्या वचनांत असल्याप्रमाणे त्यास सोडून जात नसत. जसे काय ती त्याचेच अवयव आहेत. त्यांचा व्यास ८० इंच होता, व त्यांची जाडी सुमारे १८ इंच होती. बारीक नजरेने पाहिल्यास ती अनेक वलये दिसत. त्या सर्वांची चकाकी सारखी नव्हती. ती बारीक कणांची बनलेली आहेत, व ते कण स्वतंत्रपणे त्या गोलाभोंवती फिरत आहेत, असे दिसे.

 याखेरीज मागल्या गोलाप्रमाणे ह्याच्या भोंवतीही ह्याचें मंडल होते. त्या मंडलांत ८ परिचारक होते. ते निरनिराळ्या अंतरावर त्या भोवती फिरत. त्यांतला सहावा सर्वांत मोठा होता. त्याचा व्यास सुमारे दीड इंच होता; तो मुख्य गोलापासून ३३ फुटांवर होता. शेवटचा लहानसाच होता. त्याचा