पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६३२] तत्त्वज्ञान. ३९ वाचूनि आम्ही निरोपिलें जैसें । ययाचे अचळ मूळ असे तैसे। आणि तैसाचि जरी हा असे । साचोकारा ॥ तरि कोणाचेनि संताने । निपजती तया उन्मूळणे । काय फुकलिया गगर्ने । जाइजेल गा॥ म्हणोनि पैं धनंजया । आम्हीं वानिले रूप ते मायो। कासवीचेनि तुपे राया। वोगरिले जैसे ॥ मृगजळाची गा तळीं । तिये दिठी दुरूनि न्याहाळीं। वांचूनि तेणे पाणिय साळी केळी । लाविसी काई ॥ मूळ अज्ञानचि तंव लटिके । मा, तयाचे कार्य है केतुके। म्हणौनि संसाररुख सत्य के । वावोचि गा॥ ज्ञा. १५. २१०-२२३. ३२. अश्वत्थास आदि, अंत, व स्थिति मुळीच नाहीत. आणि अंत यया नाहीं । ऐसें बोलिजे जे काहीं। तेही साचचि पाहीं। येकेपरी ॥ तरि प्रबोध जंव नोहे । तंव निद्रे काय अंत आहे ।। की रात्री सरे तंव पाहे । तया अरौते॥ तैसा जंव पार्था । विवेक नुधवी माथा। तंव अंत नाहीं अश्वत्था । भवरूपा यया ॥...॥ तेविची हा अनादि । ऐसी आहे शाब्दी ।। तो आल नोहे निरोधी । बोलाते यया ॥...॥ वांझेचिया लेका। कैंचि जन्मपत्रिका। मी नीळी भूमिका । के कल्पू पां ॥ व्योमकुसुमांचा पांडवा । कवणे देठ तोडावा। म्हणौनि नाहीं ऐसिया भवा । आदि कैची ॥...॥ १ वर्णन केले. २ खोटें. ३ वाढणे, मेजवानी करणे. ४ भात. ५ खोटा. ६ जागृति. ७ अलीकडे. ८ काढीत नाही, उचलीत नाही. ९ आरोप.