पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शानेश्वरवचनामृत. नाहीं अज्ञानावांचूनि मूळ । ययाचे असिलेपण टवाळ। ऐसें झाड सिनेसाळ । देखिले जेणें ॥ तयाते गा पंडुसुता। मी सर्वज्ञही म्हणे जाणता । पैं वाग्ब्रह्मीं सिद्धांता । वंद्य तोचि ॥ ज्ञा. १५. ११०-१४०, ३१. अश्वत्थाचें उन्मूलन म्हणजे काय ? परि तुझ्या हन पोटीं । ऐसे गमेल किरीटी। जे येवढे झाड उत्पांटी। ऐसे कायि असे ॥ की ब्रह्मयाच्या शेवटवरी । उर्ध्व शाखांची थोरी। आणि मूळ तंव निराकारी । ऊर्वा असे ॥ हा स्थावराही तळीं । फांकत असे अधींच्या डाळीं। माजि धांवत असे दुजा मुळीं । मनुष्यरूपी ॥ ऐसा गाढा आणि अफाट । आतां कोण करी यया शेवट। तरि झणी हा हळुवंट । धरिसी भाव ॥ तरि हा उन्मूळावयोद्देशे । येथ सायाँसचि कायसे । काय बाळा बागुल देशे । दवडावा आहे ॥ गंधर्व दुर्ग काय पाडावें । काय शशविषाण मोडावे । होआवे मग तोडावें । खपुष्प की॥ तैसा संसार हा वीरा । रूख नाहीं साचोकारा। मा उन्मूळणी दरारा । कायिसा तरी ॥ .. आम्ही सांगितली जे परी । मूळ डाळांची उर्जरी। ते वांझेची घरभरी । लेकुरे जैसीं ॥ काय कीजती चईलेपणीं । स्वप्नींची तिये बोलणीं। तैसी जाण ते काहाणी। दुगळीचि ते ॥ १ खोटें. २क्षणिक. ३ उपटणारे. ४ शाखा. ५ निबिड, वलान्य. ६ क्षुद्र. • अम. ८ प्रकार. ९ जागेपणी. १० दुबळी....