पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आजची चारही पुस्तके अंतर्भूत होतात. या चार मल पुस्तकांवर विवरणात्मक « Mysticism in Maharashtra" या नांवाचा ग्रंथ हा त्या हिंदीतत्त्वज्ञानाच्या इतिहासांतील दहावा भाग होय; व तो लौकरच छापून बाहेरही निघेल. या ग्रंथाचे अध्ययन व वाचन विशेषतः युरोपांत आधिक होणार. त्यांत जी प्रमेये केली आहेत त्यांस आधारभूत अगर उपकरणभूत म्हणून हे आजचे चार ग्रंथ प्रकाशित होत आहेत, ही गोष्ट ध्यानात ठेविली पाहिजे. या कारणामुळेच या चार पुस्तकांतील काही पुस्तकांच्या शेवटी इंग्रजी हेडिंगें घातली आहेत, त्यांचा मुख्य उद्देश म्हटला म्हणजे पाश्चात्य लोकांनी आमच्या महाराष्ट्रभाषेचा अभ्यास करून त्यांतील चिद्राने ओळखण्यास शिकले पाहिजे हा होय. ___५ या अध्यात्मग्रंथमालेतील पुढील पुस्तकें जसजशी तयार होतील तसतशी ती प्रसिद्ध करण्यात येतील. आज त्यांचा नामनिर्देश करण्याचे कारण नाही. तूर्त आजचे चारच ग्रंथ प्रकाशित होत आहेत. पुढे मागें जुळून आल्यास, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञांचे व सत्पु. रुषांचे विचार व अनुभव जमेस धरून, शास्त्रीय दृष्टीचा निकष लावून, स्वानुभवास पडताळून, चिकित्सक बुद्धीनें आधुनिक लोकांस परमार्थाच्या दृष्टीने उपयोगी पडेल अशा प्रकारचा एक ग्रंथ लिहिण्याची जरूरी आहे; त्यास हे आजचे चारही ग्रंथ उपयोगी पडतील असा भरंवसा आहे. रा. द. रानडे.