पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६२९ जेव्हां आपणयां आली निद । करी आपण जेवि मुग्ध । कां काजळी आणी मंद । प्रभा दीपी॥ स्वमीं प्रियापुढे तरुणांगी। निदेली चेवउनी वेगीं। आलिंगिलेनिवीण आलिंगी । सकाम करी ॥ तैसी स्वरूपी जाली माया । आणि स्वरूप नेणणे जे धनंजया। तेचि तरू यया । मूळ पहिले ॥ वस्तूसी आपुला जो अबोध । तो उीं आठुळेजे कंद। वेदांती हाचि प्रसिद्ध । बीजभाव ॥ घनअज्ञानसुषुप्ती । तो बीजांकुरभाव म्हणती। और स्वप्न हन जागृति । हा फळभाव तियेचा ॥ ऐसी यया वेदांती । निरूपणभाषाप्रतीती। परी ते असो प्रस्तुतीं । अज्ञान मूळ ॥ ज्ञा. १५. ८०-९०. ३०. न श्वोऽपि तिष्ठतीति अश्वत्थः। आणि अश्वत्थ ऐसे ययाते । म्हणती जे जाणते । . . . तेही परिस हो येथे । सांगिजेल तरि अश्वत्य म्हणिजे उखां । तोवरि एकसारिखा। .. नाहीं निर्वाह यया रुखा । प्रपंचरूपा ॥ जैसा न लोटतां क्षण । मेघ होय नानावर्ण। ..... कां विजू नसे संपूर्ण । निमेषभरी ॥ कांपतया पद्मदळा- वरीलिया वैसका नाहीं जळा। कां चित्त जैसे व्याकुळा । माणसाचे ॥. तैसीच ययाची स्थिति । नासत जाय क्षणक्षणाप्रति । . म्हणोनि ययाते म्हणती । अश्वत्थ हा ॥ आणि अश्वत्थ येणे नांवे । पिपळ म्हणती स्वभावें। परि तो अभिप्राय नोहे । श्रीहरीचा ॥ - १ बनतो. २ उषःकाल. ३ स्थिति..