पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२९] तत्वज्ञान. जो नाइकिजता नाद । जो असौरभ्य मकरंद। जो आंगाथिला आनंद । सुरतेविण ॥ जयां जे आहां पैरौते । जया जे पुढे मागौतें । दृश्येविण देखते । अदृश्य जे॥ उपाधीचा दुसरा । घालितां वोपसरा। नामरूपाचा संसारा । होय जयाते॥ ज्ञातृशेयाविहीन । नुसचिज ज्ञान । सुखा भरलें गगन । गाळीव जे जे कार्य ना कारण । जया दुजे ना एकपण । आपणयां जे जाण । आपणचि ॥ ऐसे वस्तु जे सांचे । ते ऊर्ध्वगा यया तरूचे। तेथ और घेणे मुळाचें । ते ऐसे असे ॥ ज्ञा. १५. ७२-७९. २९. मुळाचा बीजांकुरफळभाव. तरी माया ऐसी ख्याती । नसतीच यया आथी। कां वांझेची संतति । वानणे जैसे॥ तैसी सत् ना असत् होय । जे विचाराचे नाम न साहे। ऐसे यापरीची आहे । अनादि म्हणती॥ जे नाना तत्त्वांची मांदुस। जे जगदभ्राचे आकाश। जे आकारजाताचे दुस । घडी केले॥ जे भवद्रुमबीजिका । जे प्रपंचचित्रभूमिका। विपरीतज्ञानदीपिका । सांचली जे ॥ ते माया वस्तुच्या ठायीं । असे जैसेनि नाहीं।। मग वस्तुप्रभाचि पाहीं। प्रगट होय ॥ १ घ्राणीला अप्राप्त. २ अलीकडे. ३ पलीकडे.४ मिना, हीन खडा हिरकणी सारखा दिसावा म्हणून ज्याने पूट देतात तो. ५ अंकुर. ६ पेटी. ७ वन.