पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६२७ आणि आथी नाथी तितुके । रुंधले असे येणेचि एके। कल्पांतींचेनि उदके । व्योम जैसे ॥...॥ यया फळ ना चुंबिता । फूल ना तुरंबिता ॥ जे काही पंडुसुता। ते रुखचि हा ॥ हा ऊर्ध्वमूळ आहे । परि उन्मळिला नोहे। येणेचि हा होये । शाडळ गा ॥...॥ आतां उर्ध्व या कवण । येथे मूळ ते किंलक्षण । कां अधोमुखपण । शाखा कैसिया ॥...॥ आणि अश्वत्थ हा ऐसी । प्रसिद्धी कायसी। आत्मविदविलासीं । निर्णय केला ॥ हैं आघवेंचि बरवें । तुझिये प्रतीतीसि फांव। तैसेनि सांगो सोलिवे । विन्यासे गा॥...॥ ऐसे प्रेमरसे सुरफुरे । बोलिले जव यादववीरें। तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त झाले ॥ देव निरूपिती ते थेर्कुले । एवढे श्रोतेपण फांकले। जैसे आकाशा खेवै पसरिले । दाही दिशीं ॥ श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हणीनि घोट भरो पाहे एकसरा। अवघेयाचा ॥ ज्ञा. १५. ४६-७.. २८. उर्ध्वमूळ म्हणजे काय ? मग म्हणे धनंजया । ते उर्ध्व गा तरू यया। येणे रुखेचि कां जया । उर्ध्वता गमे ॥ येन्हवीं मध्योर्ध्वअध । हे नाही जेथ भेद । अद्वयासी एकवद । जया ठायीं ॥ १ व्यापिलें. २ वास घेणारा. ३ उपटलेला. ४ हिरवागार. ५ विस्ताराने. भरपुर, पूर्णपणें. ७ थोडें. ८ आलिंगन. ९ एकवाक्यता.