पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२७] तत्त्वज्ञान. कां परता केलिया आरसा । लोप जाला तया आरसा। तरि आपण नाहीं ऐसा । निश्चय करावा ॥...... येथ आत्मा आत्मयाच्या ठायीं। देखिजे देहींचा धर्म देहीं। ऐसे देखणे ते पाहीं । आन आहाती ॥...॥ तैसी विवेकाचेनि पैसे' । जयांची स्फूर्ति स्वरूपी बैसे। ते ज्ञानिये देखती ऐसें । आत्मयाते ॥ जैसे तारांगणी भरले । गगन समुद्री बिंबले। परि ते तुटोनि नानी पडिले । ऐसे निवेडे ॥...॥ कां नाडरचि भरे शोषे । सूर्य तो जैसा तैसाचि असे। देह होतां जातां तैसें । देखती माते ॥...॥ चैतन्य चढें ना वोहटे । चेष्टवी ना चेष्टे । ऐसे आत्मज्ञाने चोखटे । जाणती ते ॥ ज्ञा१५. ३६१-३९०. --- २७. विश्वाश्वत्थाचें वर्णन. अगा मैं पंडुकुमरा । येतां स्वरूपाचिया घरां।...: करीतसे आडवारा । विश्वाभास जो। तो हा जगडंबरू । नोहे येथ संसारू। हा जाणिजे महातरू । थांवला असे ॥ परि येरां रुखांसारिखा । हा तळी मुळे, वरी शाखा। तैसा नोहे, म्हणोनि लेखा । नयेचि कवणा ॥...॥ अर्जुना हे कवतिक । सांगता असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥ जैसा भानु उंची नेणो के। रश्मिजाळ तळी फांके। संसार हे कावरुखे । झाड तैसें ॥ । विस्ताराने. २ स्पष्ट भासतें. ३ डबकें. ४ प्रतिबंध. ५ वाढलेला, पसरलेला. ६ वृक्षाप्रमाणे. ७ लक्षांत, समजुतीत.८ आश्चर्य. ९ आश्वर्यकारक..