पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञान, भक्ति, व कर्म यांचा समुच्चय करण्याचा आहे. यामुळेही या ग्रंथमालेच्या अभ्यासाचे किती महत्त्व आहे हे सांगावयास नको. ३. आजकाल आपल्या विश्वविद्यालयांतून महाराष्ट्रभाषेचे अध्ययन जारीने सुरू होत आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे. जें स्थान इंग्रजी भाषेमध्ये चौसर, शेक्सपियर, मिल्टन् , वर्ड्सवर्थ इत्यादिकांनी पटकावले आहे, तेंच स्थान वाङ्मयदृष्टीने ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, व रामदास यांनी महाराष्ट्रभाषेत पटकावलें आहे असे म्हणण्यास हरकत नाही. बायबलचा ज्याप्रमाणे वाङ्मयाच्या दृष्टीने अभ्यास होतो, त्याप्रमाणेच आमच्या साधूंच्या ग्रंथांचा वाङ्मयाच्या दृष्टीनेही अभ्यास व्हावयास पाहिजे. रवींद्रनाथ टागोर यांचा गीतांजलि हा ग्रंथ उत्कृष्ट आहे यात शंका नाही; परंतु तुकारामज्ञानेश्वरांचे अध्ययन केले असता त्यांचे ग्रंथ तितकेच किंवा त्याहूनही सरस आहेत हे वाचकांच्या ध्यानात येईल. किंबहुना, तुकारामज्ञानेश्वरादिकांच्या अगर तत्सदृश साधूंच्या वचनांचा फैलाव जो हिंदुस्थानांत झाला त्याचे गीतांजलि हे एक आधुनिक निदर्शन आहे असे म्हणण्यास हरकत नाही. या कारणास्तव महाराष्ट्रवाङ्मयाच्या व महाराष्ट्रधर्माच्या आधारभूत असलेल्या या ग्रंथांचा अभ्यास आमच्या विश्वविद्यालयांतून अवश्य व्हावयास पाहिजे. चमत्काराच्या दृष्टीने या साधूंच्या चरित्रांकडे न पाहतां त्यांच्या ग्रंथोक्तींच्या दृष्टीने त्यांजकडे पहावयास आपण शिकलें पाहिजे; व अशा रीतीने त्यांजकडे पाहिले असतां बुद्धिवादास पटेल अशाच प्रकारचा अनुभव ( Rational Mysticism ) त्यांच्या ग्रंथांत सांगितला आहे असे दिसून येईल. ४. "अध्यात्मविद्यापीठ"(Academy of Philosophy and Religion ) या संस्थेतर्फे हिंदी तत्त्वज्ञानाचा इतिहास जो सोळा भागांत लिहिण्यांत यावयाचा आहे, त्यांतील पंधराव्या भागांत हीं