पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [ ६.२३ या देहाची हे दशा । आणि आत्मा तो ऐसा। मैं शुद्ध नित्य अपैसा । अनादिपणे ॥ सकळ ना निष्कळ । अक्रिय ना क्रियाशीळ। कृश ना स्थूळ । निगुणपणे ॥ .. साभास ना निराभासा प्रकाराना अप्रकाश । अल्प ना बहुवस । अरूपपणे ॥ रिता ना भरित । रहित ना सहित । मूर्त ना अमूर्त । शून्यपणे ॥ आनंद ना निरानंद । एक ना विविध । मुक्त ना बद्ध । आत्मपणे ॥ येतुला ना तेतुला । आइता ना रचिला। बोलता ना उगला । अलक्षपणे ॥ सृष्टीचा होणा न रचे । सर्वसंहार न वचे आथी नाथी या दोहींचे। पंचत्वं हा॥...॥ तैसे तयाचिये अनुस्यूतो। होती जाती देहाकृती। तो घे ना सांडी सुमती। जैसा तैसा॥ अहोरात्रे जैसीं। येती जाती आकाशी। आत्मसत्ते तैसीं । देहे जाण ॥...॥ संसगै चेष्टिजे लोहे। परी लोह भ्रामक नोहे । क्षेत्र क्षेत्रशा आहे । तेतुला पाड ॥ ज्ञा. १३. १०९५-११२४. २४. सत्वरजतमवृत्तींचा मृत्यूवर परिणाम. पैं रजतमविजयें । सत्व गा देहीं इये । घाढतां चिह्न तिये । ऐसी होती ॥ जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समातो बाहेरीं वोसंडे। १सहज.२ नाश होणे. ३ मरण. ४ अखंडपणामुळे. ५ मावल्यामुळे. ६ सोडते.