पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. [६३१ मापणेनीचि अवकाश । वसवीत असे जो॥ जो नादे ऐकिजता नाद । स्वाद चाखिजता स्वाद । जो भोगिजतसे आनंद । आनंदेचि॥ जो पूर्णतेचा परिणाम । पुरुष गा सर्वोत्तम। विश्रांतीचाही विश्राम । विराला जेथे ॥ सुखासी सुख जोडले । जे तेज तेजासि सांपडले। शून्यही बुडालें । महाशून्यीं जिये ॥...॥ पैं नेणतयाप्रती । रुपेपणाची प्रतीती। रुपे न होनि शुक्ति । दावी जेवीं ॥ . का नाना अलंकारदशे । सोन न लपत लपाले असे। विश्व न होनियां तैसें । विश्व जो धरी ॥ हे असो जलतरंगा । नाहीं सिनानपण जेविं गा। तेविं सत्ता प्रकाश जगा । आपणचि जो ॥...॥ तैसा विश्वपणे कांहीं होये । ना विश्वलोपी केही जाये। जैसा रात्रि दिवसे नोहे । द्विधा रवी॥ तैसा कांहींचि कोणीकडे । कायिसेनिही वेची न पडे । जयाचे सांगडे । जयासीची ॥ ज्ञा. ११. ५४०-५५६. २२ क्षेत्रविचार. रथांगाचा मेळावा । जेविं रथ म्हणिजे पांडवा। कां अधोवं अवेवानाम देह। का चतुरंगसमाजे। सेना नाम निपजे। कां वाक्ये म्हणिपती पुंजे । अक्षरांचे ॥...॥ का स्नेह सूत्र वह्नी । मेळ एकिये स्थानी। १ कोठे. २ नाश. ३ तुलना, सारखेपणा. ४ रथाचे अवयव. ५ समुदाय. ६ तेल, ७ वात. - -