पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। तत्त्वज्ञान. दर्पणाचिया जवळिका । दुजेपण जैसे ये मुखा। कां कुंकुमें स्फटिका । लोहितत्व ये ॥ तैसा गुणसंगमे । अजन्मा हा जन्में। पावत ऐसा गमे । येहवीं नाहीं ॥...॥ हा प्रकृतीमाजो उभा । परि जुई जैसा वोर्थबा। एया प्रकृति पृथ्वी नभा। तेतुला पाड। प्रकृतिसरितेच्या तटीं । मेरु होय हा किरीटी। माजि बिंबे परी लोटर्टी। लोटो नेण ॥ प्रकृति होय जाये। हा तो असतचि आहे । म्हणोनि आब्रह्माचे होये । शासन हा ॥...॥ हा महब्रह्म गोसावी। ब्रह्मगोलकलाघवी। अपारपणे मँवी । प्रपंचातें॥ पैंया देहामाझारी । परमात्मा ऐसी जे परी। बोलिजे ते अवधारी । ययातची॥...॥ जो निखळपणे येणे । पुरुषा यया जाणे । आणि गुणाचे करण । प्रकृतीचे ते ॥ हे रूप हे छाया। पैल जळ हे माया। ऐसा निवाड धनंजया। जेवि कीजे ॥ तेणे पाडें अर्जुना । प्रकृतिपुरुषविवंचना । जयाचिया मना । गोचर जाहालो। तो शरीराचेनि मेळे। करूं का कम सकळे। परि आकाश धुई न मैळे । तैसा असे ॥ आथिलेनि देहें । जो न "घेपे देहमोहें । देह गलिया नोहे । पुनरपि तो॥ सा ऐसा तया एक । प्रकृतिपुरुषविवेक । १ तांबडेपणा. २ जुईचा वेल. ३ आश्रय, टेका. ४ योग्यता, ५ प्रवाहानें. ६ लोटला जात नाही. ७ मोजतो. ८ केवळपणाने, शुद्धपणाने, ९ आभास, मृगजळ...१० अवगत. ११ संयोगाने. १२ धुरळ्याने. १३ असलेल्या. १४ घेतला जात नाही. - - -