पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. . ज्ञानेश्वरवचनामृत [६१६ रूप ना वर्ण । नाम आथी ॥...॥ है प्रतिक्षणी नित्य नवी । रूपागुणाचीच आघवी। जडातेही माजवी । इयेचा माज ॥...॥ कायि मन हे नपुंसक । की ते भोगवी तिन्ही लोक । ऐसे ऐसे अलौकिक । करणे इयेचे ॥...॥ कळा येथुनि जालिया। विद्या इयेच्या केलिया। इच्छा ज्ञान किया। वियाली है॥ हे नादांची टांकसाळ । हे चमत्काराचे वेळाउळ । किंबहुना सकळ । खेळ इयेचा॥ जे उत्पत्ति प्रलय होत । ते इयेचे सायंप्रात । है असो अद्भुत । मोहन हे ॥...॥ तया स्वयंभाची संभूती । तया अमूर्तीची मूर्ति । आपण होय स्थिती । ठावो तया ॥...॥ तया निर्गुणाचे गुण । तया अचरणाचे चरण । तया अश्रवणांचे श्रवण । अचमूचे चक्षु ॥ ऐसेनि इया प्रकृति । आपुलिया सर्वव्याप्ति । तया अविकाराते विकृति- माजी कीजे ॥ तेथ पुरुषत्व जे असें । ते इये प्रकृतिदशे । चंद्रमा अंवसे । हरपला जेवी॥...॥ जैवी पय पशूच्या पोटी। कां वह्नि जैसा काष्ठीं। गुंडूनि घेतला पटीं । रत्नदीप ॥ राजा पराधीन जाहला । कां सिंह रोगे रुंधला। तैसा पुरुष प्रकृति आला । स्वतेजा मुके ॥ जागता नर सहसा । निद्रा पाडूनि जैसा। स्वप्नींचिया सोसा। वश्य कीजे ॥...॥ . १ प्रकृति. २ शब्द. ३ घर. ४ उत्पत्ति. ५ विकारवश. ६ गुंडाळून. ७ व्यापला. ८ खटपट.