पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. आतां तेणेंचि पसायें । तुम्हां संतांचे मी पाये। वोळेगेन अभिप्रायें । श्रीगीतेचेनी ॥ ज्ञा. १५. १८-२८. १२. ज्ञानेश्वरांची संतांपुढे नम्रता. अहो पुंसा आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे । कां करविलेनि चीजे न रिझे। बाळका माय ॥ तेविं मी जे जे बोले । ते प्रभु तुमचेंचि शिकविले । म्हणोनि अवधारिजो आपुले । आपण देवा ॥ हे सारस्वताचे गोड । तुम्हींचि लाविले जी झाड। तरी आतां अवधानामृते वाड । सिपोनि कीजे ॥ मग हे रसभाव फुली फुलेल । नानार्थफळभारे फळा येईल । तुमचेनि धमै होईल । सुरवाड जगा॥ या बोला संत रिझले । म्हणती तोषलो गा भलें केलें ॥ आतां सांगे जे बोलिले । अर्जुन तेथे ॥ तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनाचे बोलणे। मी प्राकृत काय सांगों जाणे । परि सांगवा तुम्हीं ॥ .. अहो रानींचिया पालेखाइरां । नेवाण करविले लंकेश्वरा। एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई॥ म्हणोनि समर्थ जे जे करी । ते न हो न ये चराचरीं। तुम्हीं संत तयापरी । बोलवा मात ॥ ज्ञा. ११. १७-२४, १ प्रसाद. २ सेवीन. ३ पोपट. ४ डोलवणे. ५ कौतुक. ६ संतुष्ट होणे. ७ मोठे. ८ सुख. ९ नःश.