पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६११] प्रास्ताविक. परि मी आजि तुझ्या गुणीं । लांचावलो अपराध न गी । भलते करी परी अर्धधणी । नुठी कदा ॥ ज्ञा. १६. १७-३८. ११. श्रीनिवृत्तींच्या कृपेचे महत्त्व. तरि बहु बोलू काई । आजि ते आन ठाई ॥ मातेवांचूनि नाहीं । ज्ञानदेव म्हणे ॥ जे तान्हनि मियां अपत्ये । आणि माझे गुरूसी एकुलते। म्हणोनि कृपेसी एकहाते । जाले तिये ॥ पाहा पां भरोवरी आघवी । मेघ चातकासी रिचवी । मजलागीं गोसावी । तैसें केले ॥ म्हणोनि रिकामे तोंड । करूं गेले बडबड । की गीता ऐसे गोड । आतुडले॥ होय अदृष्ट आपैते । ते वाळचि रत्ने परते। उजूं आयुष्य तें मारिते । लोभ करी ॥ आधणी घातलिया हरळ । होती अमृताचे तांदुळ । जरी भुकेची राखे वेळ । श्रीजगन्नाथ ॥ तयापरी श्रीगुरु । करिती जे अंगिकारूं। से होऊनि ठाके संसारु । मोक्षमय आघवा॥ पाहा पां काई श्रीनारायण । तया पांडवांचे उणे । कीजेचि ना पुराणे । विश्ववंद्ये ॥ तैसे श्रीनिवृत्तिराजे । अज्ञानपण हे माझे। आणिले वोजे । ज्ञानाचिये ॥ परि हे असो आतां । प्रेम रुळतसे बोलतां । के गुरुगौरव वर्णितां । उन्मेष असे ॥ १ सवकलों. २ अतृप्त. ३ एकुलतें एक. ४ सामुग्री. ५ ओतणे. ६ सांपडले. ७ सरळ. ८ खडे. ९ योग्यता. १० मळणे. ११ बुद्धि. - -