पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- अध्यात्मग्रंथमाला । १. या ग्रंथमालेचे मुख्य प्रयोजन म्हणजे लोकांस परमार्थाचे उज्ज्वल - स्वरूप महाराष्ट्रवाङ्मयांतून उघड करून सांगणे हे होय. ज्ञानेश्वरांपासून . रामदासांपर्यंत जे साधु महाराष्ट्रांत निर्माण झाले त्यांनी अशा प्रका रची उज्ज्वल ग्रंथरचना मराठीत करून ठेविली आहे की तिचे - वाङ्मयदृष्टया व परमार्थदृष्टया फारच मोठे महत्त्व आहे. परमार्थाF- बद्दलच्या निरनिराळ्या भ्रामक कल्पनांचे निरसन करून शुद्ध पर मार्थाचे स्वरूप समजावून देणे हे महाराष्ट्रवाङ्मयाचे पवित्र कर्तव्य आहे. हे कार्य महाराष्ट्रवाङ्मयांतून जितक्या उत्कृष्ट रीतीने सिद्धीस गेले आहे तितकें हिंदुस्थानच्या इतर प्रांतिक भाषांतून, अगर पाली अगर प्राकृत भाषांतून, अगर खुद्द संस्कृतभाषेतूनही सिद्धीस गेलें आहे किंवा नाही याची. शंकाच आहे. नुसते परमार्थाचे खरे स्वरूप समजून देण्याचे सामर्थ्य महाराष्ट्रवाङ्मयांत आहे इतकेच नव्हे, तर सर्व धर्माचें एकीकरण करण्याचे सामर्थ्यही महाराष्ट्रवाङ्मयांत आहे. धर्माधर्मातील लढे केवळ अज्ञानामुळे उत्पन्न होतात; पण परमार्थाचे शुद्ध स्वरूप कळल्यास ते लढे नाहीसे करण्याचे सामर्थ्य त्यांत आहे असे म्हणण्यास हरकत नाही. यामुळे आमच्या महाराष्ट्राच्या धार्मिक वाङ्मयाचा सशास्त्र अभ्यास होणे किती जरूरीचें आहे हे सांगण्याचे कारण नाही.. ___२. आज या अध्यात्मग्रंथमालेतील पहिली चारच पुस्तकें प्रसिद्ध होत आहेत. ही चार पुस्तकें म्हटली म्हणजे महाराष्ट्राच्या धार्मिक वाङ्मयाचा संपूर्ण निष्कर्ष होय. पहिल्या पुस्तकांत ज्ञानेश्वरीतील उताऱ्यांची विषयवार रचना करून ज्ञानेश्वरांची सर्वांगीण पारमायिक शिकवण कशी होती हे संपूर्ण रीतीने त्यांच्याच शब्दांत सांग. ण्याचा प्रयत्न केला आहे. दुसऱ्या पुस्तकांत तीन भाग आहेत.