पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६.] प्रास्ताविक ६. गुरुकृपेचे आवाहन. जयजय वो शुद्धे । उदार प्रसिद्ध । अनवरत आनंदे । वर्षतिये ॥ विषयव्याले मिठी। दिधलिया नुठी ताटी। ते तुझीये कृपादृष्टी । निर्विष होय ॥ तरि कवणात तापु पोळी । कैसेनि वो शोक जाळी । जरि प्रसादरसकल्लोळी । पुरे येसी तूं॥ योगसुखाचे सोहळे । सेवकां तुझेनि स्नेहाळे । सोहंसिद्धिलेळे । पाळिसी तूं ॥ आधारशक्तीचिया अंकीं। वाढविसी कौतुकीं। हृदयाकाशपालखीं। परिये देसी निजे ॥ प्रत्यग्ज्योतीची वोवाळणी । करिसी मनपवनाची खेळणीं। आत्मसुखाची बाळलेणीं । लेवविसी ॥ संतरावियेचे स्तन्य देसी । अनाहताचा हल्लर गासी। समाधिबोधे निजविसी । बुझाउनी ॥ म्हणोनि साधकां तूं माउली।पिके सारस्वत तुझिया पाउलीं। याकारणे मी साउली । न संडी तुझी ॥...॥ श्रीकृष्णगुणी माते । सर्वत्र करी वो सरते। राणिवे बैसवी श्रोतयांत । श्रवणाचिये ॥ ये महाठियेचियां नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळ करी। घेणे देणे सुखचिवरि । हो देई या जगा॥ तूं आपलेनि स्नेहपल्लवे । माते पांघुरविशील सदैवें । तरि आतांचि हे आघवे । निर्मीन माये ॥ इये विनवणीयेसाठीं । अवलोकिले गुरुकृपादृष्टी । म्हणे गीताथसी उठीं। न बोलें बह ॥ ---१ विस्मृति जात नाही. २ हपृ. ३ मूलाधारचक्र. ४ झोके. ५ अमृतकला. ६ गाणे. ७ समजावून देणे. ८ विद्या. ९ राज्यपद. १० पदर.