पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. जरी अतींद्रिय लाहिजे । ज्ञानबळ ॥ नातरी जे धातुवादियांहीं नजोडे।तें लोहींचि पंधरसांपडे। जरी दैवयोगे चढे । परिस हाता॥ तैसी सद्गुरुकृपा होये। तरी करितां काय आपु नोहे। म्हणऊनि ते अपार माते आहे । ज्ञानदेव म्हणे ॥ ज्ञा. ६. ३२-३५. ५. गुरुकृपेचे वर्णन करणे शक्य नाही. हे असो दिठि जयावरी झळके। की हा पद्मकर माथांपाढूखे। तो जीवचि परि तुके । महेशंसी ॥ एवढे जिये महिमेचे करणे । ते वाचाबळे वानूं मी कवणे । का सूर्याचिया आंगा उटणे । लागत असे ॥ केउतां कल्पतरूवरी फुलौरा । कायसेनी पाहुणेरक्षीरसागरा। कवणे वासी कापुरा । सुवास देवों॥ चंदनात कायसेनि चचीव । अमृताते केउते रांधावें। गगनावरी उभवावें । घडे केवीं॥ तैसे श्रीगुरुचे महिमान । आकळिते के असे साधन । हे जाणोनियां नमन । निवांत केले ॥ जरी प्रक्षेचेनि ओथिलेपणे । श्रीगुरुसामर्थ्यां रूप करूं म्हणे। तरि ते मोतियां भिंग देणे । तैसे होईल ॥ कां साडेपंधरयो रजतवणी । तैशी स्तुतीची बोलणी। उगियाचि माथा ठेविजे चरणीं । हचि भले ॥ ज्ञा. १० ९-१५ १ किमया करणारे.-२ लोखंडांत. ३ सोने, ४ स्वाधीन. ५ चमकेल, प्रकाश करील. ६ स्पर्श करील. ७ उटी. ८ कोठून. ९ संपन्नता. १० वर्णन करण. ११ चकाकीकरतां पुट देणे १२ उत्तम सोने. १३ रुप्याचे पाणी.