पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६२ ज्ञानेश्वरवचनामृत. २. ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा. - ऐसे श्रीनिवृत्तिनाथाचे । गौरव आहे जी साचें। ग्रंथ नोहे हे कृपेचं । वैभव तिये॥ क्षीरसिंधुपरिसरी । शक्तीच्या कर्णकुहरी । नेणों के श्रीत्रिपुरारी । सांगितले जे ॥ ते क्षीरकल्लोळा आंत । मकरोदरी गुप्त ॥ होता तयाचा हात । पैठे जाले ॥ तो मत्स्येंद्र सप्तशृंगी । भग्नावयवा चौरंगी। भेटला की तो सर्वांगी। संपूर्ण जाला ॥ मग समाधी अव्यत्यया। भोगावी वासना या। ते मुद्रा श्रीगोरक्षराया। दिधली मीनीं ॥ तेणे योगाब्जिनीसरोवर । विषयविध्वंसैकवीर। तिये पदीं कां सवेश्वर । अभिषेकिले। मग तिही ते शांभव । अद्वयानंदवैभव । संपादिले सप्रभव । श्रीगैनीनाथा ॥ तेणे कळिकळित भूतां । आला देखोनि निरुता। ते आज्ञा श्रीनिवृत्तिनाथा । दिधली ऐसी ॥ .. ना आदिगुरु शंकरा । लागोनि शिष्यपरंपरा। बोधाचा हा संसरा । जाला जो आमुते ॥ तो हा तूं घेऊनि आघवा । कळी गिळितयां जीवा। सर्व प्रकारी धावा । करी पां वेगीं। आधीच तंव तो कृपाळु । वरि गुरु आशेचा बोलु। जाला जैसा वर्षाकाळु। खवळणे मेघां ॥ मग आर्ताचेनि वोरस । गीतार्थग्रंथनमिसे। वर्षला शांतरसें । तो हा ग्रंथ ॥ १ सन्निध. २ स्वाधीन. ३ मत्स्येंद्रनाथांनी. ४ ओघ, विस्तारः ५ धावूनरक्षण करणे. ६ पान्हा...