पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत HD १ प्रास्ताविक १. ज्ञानेश्वरीरचनेचा स्थलकालनिर्देश. . ऐसे युगी परि कळी । आणि महाराष्ट्रमंडळीं। श्रीगोदावरीच्या कूली । दक्षिणिलीं ॥ त्रिभुवनैकपवित्र । अनादि पंचक्रोश क्षेत्र । जेथ जगाचे जीवनसूत्र । श्रीमहालया असे ॥ तेथ यदुवंशविलास । जो सकळकळानिवास । न्यायाते पोषी क्षितीश । श्रीरामचंद्र ॥ तेथ महेशान्वयसंभूते । श्रीनिवृत्तिनाथसुते। केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे ॥ एवं भारताच्या गांवीं । भीष्मनाम प्रसिद्ध पर्वी। श्रीकृष्णार्जुनी बरवी । गोठी जे केली॥ जे उपनिषदांचे सार । सर्व शास्त्रांचे माहेर। परमहंसी सरोवर । सेविजे जे ॥ तिये गीतेचा कलश । संपूर्ण हा अष्टादश । म्हणे निवृत्तिदास । ज्ञानदेव ॥ पुढती पुढती पुढती । इया ग्रंथपुण्यसंपत्ती। सर्वसुखी सर्वभूतीं। संपूर्ण होइजे॥ शके बाराशते बारोत्तरें । तें टीका केली ज्ञानेश्वरें। सञ्चिदानंदबाबा आदरे । लेखकु जाहला ॥ ज्ञा. १८. १८०३-१८११. १ दक्षिणभागाच्या तीरावर. २ आदिनाथांच्या परंपरेतील.