पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भक्तालयांत गीतारत्नेश्वराची स्थापना. " म्हणौनि तपाचा धनुर्घरा । तळी दाटोनि गाडोरा । वरि गुरुभक्तीचा पुरा । प्रासाद जो जाहला ॥ आणि श्रवणेच्छेचा पुढां । दारवंटा सदा उघडा । वरि कलश चोखडा । अनिंदारत्नांचा ।। ऐशा भक्तालयी चोखटीं। गीतारत्नेश्वर हा प्रतिष्ठी । मग माझिया संवसाटीं । तुकसी जगीं ॥" ज्ञा. १८. १५०७-१९०९.