पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

... ज्ञानेश्वरवचनामृत. 'सुखाच्या राज्यावर आपल्यास पट्टाभिषेक करवितो (क्र. १७५). आतां देव व भक्त हा भेद कोठे राहिला? दोन उटलेले सारखे आरसे एकमेकांपुढे ठेविले असतां कोण कोणास प्रतिबिंबितो असें म्हणावें ! अर्जुनाने आपल्यास श्रीरुष्णासकट यावेळी कृष्णामधे पाहिले, व श्रीकृष्णाने आपणांस अर्जुनासकट अर्जुनामध्ये पाहिले संजयही हा प्रसंग सांगत असतां इतका तन्मय होऊन गेला की तोही त्या दोघांमध्ये लुप्त होऊन गेला (क्र. १७६). २५. अशा प्रकारचे देव व भक्त जेथे आहेत तेथे कोणत्याही कायांत यश यावयाचेंच. जेथें चंद्र तेथें चंद्रिका; जेथें वह्नि तेथे दहनसामर्थ्य, जेथें सूर्य तेथे प्रकाश हा असावयाचाच. कृष्ण हा प्रत्यक्ष विजयरूप असल्याने, व अर्जुन हा बिजयी असल्याने, कार्यात यश हे ठरलेलेच आहे. येवढी मायबा जेथे आहेत त्या देशींची झाडे कल्पतरु बनतील; पाषाण चिंतामणि होतील त्या गांवच्या नद्या अमृताने वाहतील; त्यांचे बिप्लाट शब्द वेदांइतके प्रमाणभूत होतील; व ते प्रत्यक्ष सदेह सच्चिदानंदरूप बनतील. व्यासांच्या शब्दांवर तमचा विश्वास असेल तर हे खरें माना; जेथे श्रीवल्लभ, व जेथे भक्तकदंब आहे, तेथें सुख व मंगळाचा लाभ झालाच पाहिजे. ही गोष्ट खोटी होईल, तर मी व्यासांचा शिष्यच नव्हे, असे म्हणून संजयाने या वेळी आपला बाहु उभारला (क्र. १७७ ). ज्ञानेश्वरमहाराज याचे वर्णन करून देवाजवळ एकच प्रसाददान मागतात. ते हे की, या जगांत सर्वदुष्टांचा व्यंकटभाव नाहीसा व्हावा;सर्व जीवांचे एकमेकांशी अपरिमित मैत्र जडावें,स्वधर्मसूर्याचा सर्व विश्वांत प्रकाश व्हावा, ज्यांस जे पाहिजे असेल ते त्यांस मिळावे, प्रत्यक्ष चालते कल्पतरु, अगर सजीव चिंतामणीच्या खाणी, अगर बोलते अमृताचे सागर असे इश्वरनिष्ठ भक्त सर्व भूतांस भेटावे. या ज्ञानेश्वरांच्या मागण्याने विश्वेश्वरास मोठा संतोष झाला, व त्याने "हा प्रसाद होईल' असा ज्ञानेश्वरांस वर दिला (क. १७८ ). २६. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ फार गहन आहे हे सांगण्याचे प्रयोजन नाही. ज्ञानेश्वरीची भाषा जुनी असल्याने काही ठिकाणी ती दुर्गम वाटून ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकडे लोक जसे प्रवृत्त व्हावेत तसे ते होत नाहीत. या प्रस्तुतच्या ग्रंथामुळे मूळ ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाकडे लोकांचे लक्ष जाईल तर प्रस्तुत लेखकास धन्यता वाटेल. या ग्रंथाचे कामी प्रो. शंकर वामन दांडेकर, रा. सा. बासुदेवराव दामले, रा. गणेश गोविंद कारखानीस, रा. शंकर केशव धर्माधिकारी, व रा. जगन्नाथ रघनाथ लेले या सर्वांची जी निरानराळ्या प्रकारची मदत झाली आह तिजबहल प्रस्तुत लेखक त्या सर्वांचा फार आभारी आहे. ज्ञानेश्वरवचनामृत ग्रंथ छापण्याचे कामी जद्धितच्छ प्रेसच्या मालकांनी, व प्रस्तावना छापण्याचे कामी आयभूषणप्रेसच्या मालकांनी, जी दक्षता व कार्यक्षमता दाखविली त्यांबद्दल मी त्यांचाही फार आभारी आहे. रा द. रानडे.