पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. दिसून तो तें खाऊं लागतो; भक्ताने देवास उदक जरी अर्पण केले तरी वैकुंठींच्या भवनापेक्षाही त्यास ते जास्त प्रिय वाटते ( क्र. १६१ ). भक्तास देव आपल्या डोक्यावरील मुकट करतो, अगर त्याची टांच हृदयांत बाळगतो (क्र. (१६२). सहस्रावधि नामांच्या नावा करन भक्तांस संसारसागरांतून हा पार पाडतो. 'सड्यांस ध्यानकांसेस लावून, परिग्रही लोकांस प्रेमाच्या तरियांवर घालून, तो सवासच पार उतरतो. चतुष्पादादि प्राण्यांस देखील वैकुंठीचे साम्राज्यमाकू करतो (क. १६३ ). देहांतीच्या दुःखाचंही सर्व प्रकार देव निवारण करतो. इंद्रियांचे बळ पार हारपल्यावर, आंत बाहेर मृत्युचिन्हें उमटल्यावर, भक्कास साधनास जरी बसता आले नाही, तथापि भक्ताने देवाची नित्य सेवा केली असल्याने देव शेवटी भक्काची परिचर्या करतो. अशी गोष्ट न होईल तर जन्मभर केलेल्या उपासनेचा उपयोग काय असें ज्ञानेश्वर विचारतात ? (क्र.१६४)ज्याप्रमाणे घंटानादाचा लय घंटेतच होतो, अगर झांकलेल्या घटांतील दिवा कोणास न कळतां त्यांतच निमन जातो, त्याप्रमाणे असा पुरुष आपला देह ठेवितो. असे भक्त शरीर गेल्यावर देव होतात यांत नवल ते काय ? मरणाऐलीकडेच ते मला मिळून मुक्त झालेले असतात (क्र. १६९). जीवन्मुक्ति अनुभवीत असतां या भरलेल्या जगांत तिस-याची मात नाहीशी होऊन देवाचा व भक्तांचा एकांत झालेला असतो ( क्र. १७०); आणि माझ्या स्वरूपास पोचूनही ते माझी भक्ति करतात हा किती मोठा चमत्कार म्हणून सांगावा (क. १७१ ) ! ते जे बोलतात तें माझें स्तवन, ते जे पाहतात ते माझें दर्शन, ते कल्पितात तो माझा जप; उदकाशी कल्लोळांचा, कापराशी परिमळाचा, अगर रत्नाशी तेजाचा जसा एकवट संयोग असतो, तसाच देवाचा व भक्ताचा जीवन्मुक्त्यवस्थेत एकवट संयोग होतो (क. १७२). जीवन्मुक्त्यवस्थेत खरी स्वराज्य प्राप्ति कशी होते याचे ज्ञानेश्वरांनी फार उत्तम वर्णन केले आहे. वैराग्याचे चिलखत अंगांत चढवून, राजयोगतुरंगावर आरोहण करून, हातांत ध्यानाचे खड्ग धरून मोक्षविजयश्रीला वरण्याकरितां ज्या वेळेस हा स्वार होऊन निघतो, त्यावेळेस प्रथम आडवावयास आलेले जे सहा वैरी, अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, व परिग्रह, या सर्वांचा तो फन्ना उडवितो, व नंतर अमानित्वादि गुणरूप जे केवल्यदेशींचे राजे ते यास सामोरे येतात; त्यांच्याशी मिसळन अवस्थाभेदरूपी प्रमदा सुखाचें लोण उतरीत असतां, योगभूमिका आरती करीत असतां, कादीसद्धि. वगैरे देवता अंगावर पुष्पांचा वर्षाव करीत असतां, तो जसा स्वराज्याच्या जवळ येतो तसे तीन्ही लोक आनंदाने उचंबळून जातात (क. १७४). त्यावेळी “जैत रे जैत" म्हणून ध्यानाची नौबत वाजते, व तन्मयाचे एकछत्र डोक्यावर तळपूं लागते; अशाच वेळी तो समाधिश्रियेसकट आत्म