पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्ञानेश्वरवचनामृत. २४. देव आणि भक्त यांच्या संबंधाविषयींचे ज्ञानेश्वरांचे वर्णन आत्मसाक्षात्काराच्या इतकेंच बहारीचे आहे. भक्ताने वाट पाहिली की देव त्यापुढे उभा राहिलाच असे समजावें (क्र. १५). देवसुखांत निमग्न झालेल्या भक्तांचा परस्पर सुखसंवाद अनिवर्णनीय आहे. दोन भरलेली सरोवरें जवळ जवळ असावीत आणि एकांतील तरंग दुसन्यांत, व दुसन्यांतील तरंग पहिल्यांत, असें व्हावं त्याप्रमाणे याचा अनुभव त्यास व त्याचा अनुभव यास मिळून दोघांचाही आनंद वाढतो. जणू काही त्यांच्या आनंदकल्लोळांची वेणीच पडते असे म्हटले तरी चालेल ! सूर्याने सूर्यास ओवाळावें, अगर चंद्राने चंद्रम्यास क्षेम द्यावे, त्याप्रमाणे त्यांच्या ऐक्यरसाचं प्रयाग बनतें. गुरशिण्यांतील एकांतांत ज्या एका अक्षराचा उच्चार सांगितला जातो, तो आतां ते त्रिभुवनास मेघाप्रमाणे गर्जन सांगतात. कमळकळिका उमलल्यावर ज्याप्रमाणे आंतला मकरंद बाहेर पडतो, त्याप्रमाणे त्यांच्या आंतील आनंद विश्वामध्ये पतरतो, आणि त्यांतच तेही लीन होतात ( क्र. १५५). जे कण्णाने आपल्या पित्या वसुदेवास सांगितले नाहीं, अगर माते देवकीस सांगितले नाही, अगर बंधु बळिभद्रास सांगितले नाही, ते गुह्य तो अशाच आपल्या भक्तांस सांगतो ( क्र. १५६ ). अशा भक्तांच्या अंतःकरणांत जीव व परमात्मा दोन्ही एकाच आसनावर बसून शोभायमान होतात. अशा प्रकारचा भक्त म्हणजे बल्लभा, व मी म्हणजे कांत, अशी सख्यभक्ति त्यांत उत्पन्न होते. आपल्या प्रेमास्पद मनुण्याबद्दल बोलू लागले असतां भलच पडते असे म्हणून श्रीकृष्ण या वेळी डोलू लागला (क्र. १५७ ). भक्तांच्या योगक्षेमाची काळजी देवास नेहमीच असते. जो जो भाव भक्त मनी धरील तो तो त्यास देव देतो, व दिलेल्याचे रक्षणही करतो ( क्र. १५८). समर्थाच्या कांतेस ज्याप्रमाणे कोरान्न मागण्याचा प्रसंग येत नाही, त्याप्रमाणे देवाच्या एकांतिक भक्तांस कोणतीच चिंता पडत नाही ( क्र. १५९ ). आणि ज्या प्रकारें हैं त्याचे सुख वाढेल व काळाची दृष्टी त्यावर पडणार नाही, त्या प्रकारे करणे हे देवाचें कर्तव्य बनते. लहान मूल जो जो खेळ दाखवील, तो तो त्याची माता ज्याप्रमाणे सोन्याचा करून त्याच्यापुढे ठेविते, त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील भाव देव जास्त करून पुरवितो ( क. १६० ). एखादे फळ भक्ताने देवाकडे दाखविले असतां देव दोन्ही हात पुढे करून ते घेतो; फूल दिले असता त्याचा वास घ्यावा, पण ते तों तोंडातच घालतो; वाळलेले पान दिले असताही देवास ते सर्वभावाने माखलेलें